चंदिगड - पंजाबी गायक दलेर मेहंदीला ( Daler Mehndi ) पोलिसांनी ताब्यात घेतलं असून त्याची रवानगी पटियाला तुरुंगात ( Patiala Jail ) करण्यात आली आहे. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे पंजाबी गायक दलेर मेहंदी आणि पंजाब काँग्रेसचे नेते नवज्योत सिंग सिद्धू ( Congress leader Navjot Singh Sidhu ) यांची पटियाला जेलमध्ये जोडी बनली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जेल प्रशासनाने ( Jail Administration ) दोघांनाही एकाच जेलमध्ये ठेवले आहे.
सिद्धू आणि दलेर जुने मित्र - मिळालेल्या माहितीनुसार नवज्योत सिंग सिद्धू ( Congress leader Navjot Singh Sidhu ) आणि दलेर मेहंदी खूप जुने मित्र आहेत. अनेक टीव्ही शोमध्येही ते एकत्र दिसले आहेत. आता या जोडीला तुरुंगवास देखील एकत्र भोगावा लागत आहे.
दलेर मेहंदीला या प्रकरणामुळे अटक - हा खटला 2003 चा आहे, आणि 15 वर्षांनी निकाल लागला, मानवी तस्करीच्या याआधीच्या प्रकरणात दलेर मेहंदीला 2 वर्षांची शिक्षा झाली होती, तर त्याचा भाऊ समशेर सिंगलाही शिक्षा झाली आहे. त्याला 2 वर्षांचा तुरुंगवास आणि दंडही ठोठावण्यात आला होता. हा खटला 2003 मध्ये अमेरिकेत दाखल करण्यात आला होता.