नवी दिल्ली : दोन दिवसीय G20 शिखर परिषदेला शनिवारपासून सुरुवात होणार आहे. आज दिवसभरात अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांच्या ब्रिटनचे पंतप्रधान ऋषीपर्यंत अनेक आंतरराष्ट्रीय नेते दिल्लीत पोहोचले आहे. विशातून भारतात येणाऱ्या 400 पाहुण्यांच्या स्वागतासाठी खास संगीतमय मैफलीचे आयोजन करण्यात येणार आहे. यामध्ये देशभरातील लोककलाकारांसह विविध राज्यातील 78 संगीतकार सहभागी होणार आहेत. विशेष बाब म्हणजे यामध्ये सीसीआरटी शिष्यवृत्तीधारक व्ही दक्ष भूपती हा मृदंग वाजवून सर्वांचे स्वागत करणार आहेत. हा सर्वात कमी वयाचा कलाकार असणार आहे.
चार पिढ्यांपासून संगीताचा वारसा: 12 वर्षांचा दक्ष हा सोमरविले स्कूल, वसुंधरा एन्क्लेव्ह, दिल्ली येथे आठवीत शिकतो. दक्षच्या वडिलांनी सांगितले की, त्यांच्या कुटुंबातील सदस्य हे चार पिढ्यांपासून संगीतकार आहेत. दक्ष हा पाचव्या पिढीतील कलाकार आहे. सांस्कृतिक मंत्रालयाच्या सीसीआरटी केंद्रातून शिष्यवृत्ती दिली जाते. यामध्ये 10 ते 14 वर्षे वयोगटातील कलाकारांच्या श्रेणीतील शिष्यवृत्तीसाठी यापूर्वी दक्षची निवड झाली आहे. त्यांना बालपणापासूनच मृदंगाची आवड आहे. त्याने वयाच्या चौथ्या वर्षापासून मृदंग शिकण्यास सुरुवात केलीय. भारत मंडपम येथे रात्रीच्या जेवणाच्या वेळी संगीत मैफल होणार असल्याचे सांगण्यात आल्याचं त्यानं सांगितले. यावेळी विदेशातील पाहुणे गोड पदार्थांसह भारतीय संगीताचा आनंद लुटणार आहे.
- ईटीव्ही भारतशी बोलताना दक्ष म्हणाला, की G20 परिषदेचा भाग होणं ही माझ्यासाठी अत्यंत अभिमानाची बाब आहे. संगीत कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी मिळाल्यानं पंतप्रधान नरेंद्र मोदी, संगीत नाटक अकादमीचे अध्यक्ष, सचिव, शाळेचे प्राचार्य तसेच गुरू यांचे आभार आहे.