मेष: आज लव्ह-बर्ड्सना आपल्या बोलण्यावर नियंत्रण ठेवावे लागेल. तुमचे विरोधक तुमचे नुकसान करू शकणार नाहीत. नवे नाते सुरू करण्यासाठी योग्य वेळ नाही. आज लव्ह-लाइफमध्ये यश मिळेल. योग किंवा ध्यान तुमच्या मनाला शांती देईल. अध्यात्मिक क्षेत्रात पुढे जाण्यासाठी वेळ खूप चांगला आहे.
वृषभ: आज वैवाहिक जीवन चांगले राहील. परदेशात राहणारे मित्र, प्रेयसी आणि नातेवाईक यांच्याकडून चांगली बातमी मिळेल. एखाद्या सामाजिक कार्यक्रमाला गेल्याने किंवा कुटुंबासोबत थोडासा वेळ घालवा, यातून आनंदाचा अनुभव घ्याल. मित्र आणि नातेवाईकांसह स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घ्याल. समाजात मान-सन्मान मिळेल.
मिथुन: तुमचे अनेक दिवसांपासून रखडलेले काम पूर्ण होईल. आज लव्ह-लाइफमध्ये आनंद आणि शांती तुम्हाला मानसिकदृष्ट्या प्रफुल्लित ठेवेल. आरोग्य चांगला असेल. मात्र, दुपारनंतर मित्र, जोडीदाराशी मतभेद होऊ शकतात. काळजी घेणे गरजेचे आहे. दरम्यान तुम्ही फक्त तुमच्या कामावर लक्ष दिले पाहिजे.
कर्क: आजचा दिवस शांततेत घालवाल. आज लव्ह-लाइफमध्ये काही चिंता असू शकते. तुम्हाला पोटाशी संबंधित काही समस्या असू शकतात. लव्ह-बर्ड्समध्ये मतभेद होण्याची शक्यता आहे. रिलेशनशिपमध्ये पुढे जाण्यापूर्वी तुम्हाला खूप काळजी घ्यावी लागेल. कुठे प्रवासाला जाणार असाल तर ते तुर्तास थांबवा. नोकरदारांसाठी चांगली वेळ आहे.
सिंह: लव्ह-बर्ड्स एखाद्या गोष्टीबाबत काळजी करू शकतात. तुमच्या मनातील नकारात्मक विचारांमुळे तुम्ही प्रेम जीवनात निराशा अनुभवाल. मन अस्वस्थ राहील. घरात संवाद कमी होईल. आज मित्र, जोडीदार आणि नातेवाईक यांच्याशी वैचारिक मतभेद होऊ शकतात. सकारात्मक विचार ठेवा.
कन्या: आज उत्साह आणि आनंदाच्या अनुभवामुळे मन शांत राहील. लव्ह-लाइफमध्येही यश मिळेल, समाधानाची भावना राहील. मित्र,जोडीदार आणि नातेवाईक यांच्या नात्यात गोडवा राहील. त्यांचेही सहकार्य मिळेल. जीवनसाथीसोबत तुमचे संबंध चांगले राहतील.
तूळ: आज तुमच्या मनात सतत नकारात्मक विचार येतील. रागामुळे तुमच्या बोलण्यात तिखटपणा येईल. यामुळे मित्र, जोडीदार आणि नातेवाईक यांच्याशी मतभेद होतील. तब्येत बिघडू शकते. मनात थोडी चिंता राहील. चुकीच्या आणि बेकायदेशीर कामापासून स्वतःला दूर ठेवा.
वृश्चिक: आजचा दिवस प्रेमी युगुलांसाठी आनंदात जाईल. शारीरिक आणि मानसिक आनंद मिळेल. जोडीदाराशी भेट यशस्वी आणि आनंददायक होईल. तुम्हाला काही चांगली बातमी मिळेल. मित्र आणि प्रियजनांकडून भेटवस्तू मिळाल्याने तुम्हाला आनंद होईल. वैवाहिक जीवनात गोडवा राहील.
धनु: लव्ह-लाइफमध्ये आज तुमचा दिवस थोडासा त्रासदायक असू शकतो. तब्येत खराब राहील. आज मित्र, नातेवाईक आणि जोडीदार यांच्याशी मतभेद होतील. यामुळे तुमचे मन उदास राहू शकते. नैसर्गिक आक्रमकता नियंत्रणात ठेवा. अपघाताची शक्यता राहील. खर्चात वाढ झाल्यामुळे पैशांची कमतरता भासेल.
मकर: आजचा दिवस प्रेमीयुगुल आणि नातेवाईक यांच्या भेटीमुळे आनंदात जाईल. सामाजिक क्षेत्रात आजचा दिवस लाभदायक राहील. जीवनसाथी शोधणाऱ्यांची शोध मोहीम आज संपुष्टात येण्याची शक्यता आहे. आज मित्र, नातेवाईक आणि जोडीदारासोबत कुठेतरी बाहेर जाण्याची योग आहे.
कुंभ: आज लव्ह-लाइफमध्ये आनंद राहील. लव्ह-बर्ड्ससाठी काळ चांगला आहे. मित्र, जोडीदार आणि नातेवाईक यांच्या मदतीने तुमची चिंता कमी होईल. तुमच्या वैवाहिक जीवनात आनंदाचे वातावरण राहील. आज तुम्हाला प्रेमी जीवनात विशेष यश मिळेल. नवीन नात्याचीही सुरुवात होऊ शकते.
मीन: नकारात्मकतेला तुमच्यावर वर्चस्व गाजवू देऊ नका, त्याची काळजी घ्यावी लागेल. मानसिक कोंडीमुळे तुम्हाला भीती वाटेल. आज तुम्हाला लव्ह-लाइफमध्ये सावध राहावे लागेल, वाद होण्याची शक्यता आहे. विरोधक तुमच्या मार्गात अडथळे आणू शकतात. नवीन नाते आज सुरू करू नका किंवा महत्त्वाचे निर्णय घेऊ नका.
हेही वाचा -13 June Rashi Bhavishya : 'या' राशीवाल्यांना आज संततीशी मतभेद संभवतात; जाणून घ्या, आजचे राशीभविष्य