मेषआज चंद्र वृषभ राशीत स्थित आहे. आपल्या राशी पासून चंद्र दुसरा भावात असणार आहे. आज आपणास आर्थिक व्यवहार सावधपणे करावे लागतील. वाद - विवादा पासून दूर राहिल्यास कुटुंबियांशी निर्माण होणारी कटुता टाळू शकाल. खाण्या - पिण्याची काळजी घ्या नाहीतर स्वास्थ्य बिघडवू शकते. भोजन वेळेवर घेता येणार नाही. विनाकारण खर्च होतील. घरी तसेच व्यवसायात समजूतदारपणा दाखविणे आपणास फायदेशीर राहील. आजचा दिवस आपल्यासाठी सामान्य आहे.
वृषभआज चंद्र वृषभ राशीत स्थित आहे. आपल्या राशी पासून चंद्र प्रथम भावात असणार आहे. आजचा दिवस फायद्याने भरलेला आहे. आज आपण शरीर व मनाने स्वस्थ राहाल. तसेच पूर्ण वेळ ताजेतवाने राहाल. आपल्यात असलेली कलात्मकता व सृजनात्मकता यांचा उपयोग कराल. आर्थिक योजना बनवाल. धनलाभ सुद्धा होऊ शकतो. कुटुंबियांसह आनंदात वेळ घालवाल. आज नवे कपडे, व दागिने ह्यांची खरेदी झाल्याने दिवस आनंदात जाईल. आत्मविश्वासात वृद्धी होईल.
मिथुन आज चंद्र वृषभ राशीत स्थित आहे. आपल्या राशी पासून चंद्र बारावा भावात असणार आहे. आज आपल्या उक्ती व कृती मुळे काही अडचणी निर्माण होतील. आपला आवेश व उग्रपणा ह्यामुळे वाद होण्याची शक्यता आहे. प्रकृतीस त्रास संभवतो. विशेषतः नेत्रविकार त्रास देतील. एखादा अपघात संभवतो. कुटुंबियांशी वाद होतील. प्राप्तीच्या मानाने खर्चात वाढ होईल. मन:शांतीसाठी प्रयत्नशील राहावे लागेल.
कर्कआज चंद्र वृषभ राशीत स्थित आहे. आपल्या राशी पासून चंद्र लाभात भावात असणार आहे. आजचा दिवस लाभदायी आहे. नोकरी व व्यापारात लाभ होतील. मित्रांसह आनंदात वेळ घालवू शकाल. अविवाहितांचे विवाह ठरू शकतील. उत्पन्नाच्या साधनात वाढ होईल. अचानक धन प्राप्ती होईल. आर्थिक योजना यशस्वीपणे पूर्ण होतील. रमणीय ठिकाणी प्रवासाला जाण्याचे बेत आखाल.
सिंहआज चंद्र वृषभ राशीत स्थित आहे. आपल्या राशी पासून चंद्र दशमात भावात असणार आहे. आज आपणास प्रत्येक कामात उशीरा यश मिळेल. कार्यालयात किंवा घरात जबाबदार्यांचे ओझे वाढेल. जीवनात अधिक गंभीरतेचा अनुभव होईल. नवीन संबंध स्थापित करणे किंवा कामासंबंधी महत्वाचा निर्णय घेणे हे टाळा. पित्याशी मतभेद होतील. शुभ कार्य ठरविण्यासाठी आजचा दिवस अनुकूल नाही.
कन्याआज चंद्र वृषभ राशीत स्थित आहे. आपल्या राशी पासून चंद्र भाग्यात भावात असणार आहे. आज शरीरात थकवा, आळस व चिंता अनुभवास येतील. संतती बरोबर मतभेद होतील. त्यांच्या स्वास्थ्याची चिंता सतावेल. नोकरीत वरिष्ठांशी आपला वाद होईल. राजनैतिक संकटांचा सामना करावा लागेल. एखादे मांगलिक कार्य किंवा प्रवास ह्यासाठी पैसा खर्च होईल. भावंडां कडून लाभ होण्याची शक्यता आहे.