ETV Bharat / bharat
Love Horoscope 03 October : आज कोणत्या राशींचं प्रेम आणि वैवाहिक जीवन राहील चांगलं ? जाणून घ्या लव्ह राशीफळ - भावनिक आवाहनाला प्रियकराचाही चांगला प्रतिसाद
3 October Love Rashifal: आज तुमच्या प्रेयसीसोबत तुमचा प्रेमळ संवाद होण्याची शक्यता आहे. तुमच्या भावनिक आवाहनाला प्रेयसीचाही चांगला प्रतिसाद मिळण्याची शक्यता आहे.
लव्ह राशीफळ
- मेष :आज तुमच्या जोडीदाराशी प्रेमळ संभाषण होण्याची शक्यता आहे. तुमच्या भावनिक आवाहनाला प्रेयसीचाही चांगला प्रतिसाद मिळण्याची शक्यता आहे. तुमच्या प्रेम जीवनासाठी एक चांगला दिवस. आज तुम्हाला आत्मविश्वास आणि उत्साह वाटेल. प्रेम जीवनाबद्दल तुमचा सकारात्मक दृष्टीकोन तुम्हाला योग्य निर्णय घेण्यास मदत करेल.
- वृषभ :तुमचे प्रेम जीवन आज चांगलं आहे. तुम्ही तुमच्या जोडीदाराचं मन जिंकण्यासाठी सर्जनशील मार्ग अवलंबण्याची शकता आहे. तुम्ही आज रोमँटिक किंवा एखादा आवडता चित्रपट पाहण्याची शक्यता आहे. तुमच्या जीवनात मौजमजेचा काळ आता येणार आहे. आज तुम्हाला नवीन कपडे किंवा दागिने खरेदी करण्याची इच्छा होऊ शकते.
- मिथुन : तुमच्या जोडीदारासोबत वेळ घालवल्यानं तुम्हाला ताजंतवानं वाटेल. तुम्ही तिच्यासाठी लिहिलेल्या रोमँटिक कविता वाचा. आज तुम्ही आवश्यक नसलेल्या गोष्टींवर पैसे वाया घालवाल. सुधरण्याचे तुमचे प्रयत्न चुकीच्या दिशेनं जाऊ शकतात. त्यामुळे तुमची मेहनत व्यर्थ जाणार नाही, याची काळजी घ्या. तुमची कर्तव्ये आणि जबाबदाऱ्यांबाबत अत्यंत सावधगिरी बाळगण्याची गरज आहे.
- कर्क : आज प्रेयसीवर पैसे खर्च करून तिला आनंदी ठेवण्याच्या तुमच्या प्रयत्नाला यश मिळण्याची शक्यता आहे. भेटवस्तू देण्यासाठी आजचा दिवस अतिशय शुभ आहे. खर्च करुन कोणाचं मन जिंकण्यासाठी आजचा दिवस शुभ आहे. तुमचं प्रेम फुलून येण्यासाठी आजचा दिवस चांगला आहे. मात्र करमणूक कार्यात पैसा खर्च होऊ शकतो.
- सिंह : आज तुम्ही तुमच्या प्रेम जीवनाला नवीन रूप देण्याचा प्रयत्न करण्याच्या मूडमध्ये असाल. तुम्ही आज प्रेम जीवनात उत्तम वातावरण तयार कराल, त्यामुळे तुमची एकाग्रता वाढेल. प्रेयसीनं साथ दिल्यानं तुमचा आत्मविश्वासही वाढेल. तुम्ही तुमचं काम पूर्वनियोजित वेळेत पूर्ण करू शकाल. तुम्हाला आकर्षकपणानं प्रेझेंट करण्यासाठी तुम्हाला उत्सुकता असेल. म्हणून तुम्हाला आज ब्रँडेड कपडे विकत घेण्याची इच्छा होईल.
- कन्या : प्रेम जीवनात, मन मोकळं ठेवून आज तुमची कल्पकता वाढू द्या. आज तुम्ही खूप सर्जनशील वाटाल. त्यामुळे नाविन्यपूर्ण कल्पनांचा आज तुम्ही पाठपुरावा कराल. प्रेम जीवनात आज नशीब तुमची साथ देईल. तुम्ही ज्या गोष्टींसाठी जोखीम पत्करली आहे, ती आज तुम्हाला फळ देण्याची शक्यता आहे.
- तूळ : आज तुम्ही प्रेम जीवनात व्यस्त राहणार आहात. त्यामुळे प्रेम जीवनात आज तुमचा उत्साह शिखरावर असेल. तुम्ही तुमच्या सामाजिक आणि प्रेम जीवनात संतुलन साधू शकाल. मात्र शारीरिक श्रम करण्यासाठी आजचा दिवस चांगला नाही.
- वृश्चिक : आज तुमच्या प्रेयसीच्या दबंग स्वभावामुळे तुम्हाला राग येण्याची शक्यता आहे. कदाचित यामुळे तुमचा संयम सुटण्याची शक्यता आहे. त्यामुळे तुम्हाला प्रेयसीसोबत बसून सर्व वाद सोडवण्याचा आज सल्ला दिला जात आहे. प्रेम जीवनात तणाव निर्माण होण्याची शक्यता आहे. प्रेम जीवनातील आणि प्रोफेशनल लाईफ यांच्यातील योग्य संतुलन तुम्हाला तणावपूर्ण परिस्थितीतून बाहेर येण्यास मदत करु शकेल.
- धनु : शांत मन प्रेम जीवनात तुमचा उत्साह टिकवून ठेवण्यास मदत करु शकते. आज तुमचा कल धार्मिक कार्याकडं जास्त असण्याची शक्यता आहे. मधुर संगीत ऐकल्यानं तुमच्या मनाला आराम मिळेल. वाद आणि संघर्ष बाजूला ठेवून आज गोष्टी जशा घडतात तशा घडू देण्यातच आज समाधान मानण्याची गरज आहे.
- मकर : प्रेम जीवनात तुमच्या प्रामाणिक प्रयत्नांवर आज चांगला परिणाम होण्याची शक्यता आहे. तुम्ही शेअर्स आणि स्टॉक मार्केटबाबतचं काम करत असाल, तर आजचा दिवस तुमच्यासाठी चांगला असू शकतो. तुमचा जोडीदारतुमच्या यशासाठी भाग्यवान असेल, म्हणून त्यांना यशाचं श्रेय द्या.
- कुंभ : तुम्ही प्रेम जीवनात तुमचं सर्वस्व द्याल त्यामुळे आजचा दिवस तुमच्यासाठी उत्तम आहे. स्वत:ला पुरेशी विश्रांती देण्याची वेळ आली आहे. लव्ह लाईफशी संबंधित समस्यांचं निराकरण करण्याचा आजचा दिवस आहे.
- मीन : घरात आज अनेक अडतचणींना तुम्हाला तोंड द्यावं लागणार आहे. तुमच्या प्रेम जीवनात आज वाद होण्याची शक्यता आहे. त्यामुळे तुम्हाला योग्य तो निर्णय मोठ्या संयमानं घ्यावा लागणार आहे. परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यात तुम्हाला यश येईल.
Last Updated : Oct 3, 2023, 8:56 AM IST