मेष - चंद्र आज मिथुन राशीत आहे. तो आपल्या राशी पासून तिसरा भावात असेल. आज अती विचाराने मनावर ताण येईल. मन हळवे होईल. वाद - विवाद होतील. आप्तेष्टांशी कटुता निर्माण होईल. एखादा मानहानीचा प्रसंग उदभवेल. नवीन कार्याच्या प्रारंभात अडचणी येतील. वैवाहिक जोडीदाराच्या आरोग्याची काळजी निर्माण होईल. एखाद्या स्त्रीमुळे नुकसान होण्याची शक्यता आहे.
वृषभ -चंद्र आज मिथुन राशीत आहे. तो आपल्या राशी पासून दुसरा भावात असेल. सुरवातीस काही अडचणी निर्माण झाल्या तरी आर्थिक नियोजन यशस्वीपणे करता येईल. मित्र व स्नेहीजनांच्या सहवासाने आनंदित व्हाल. व्यवसायात अपेक्षित सहकार्य मिळवू शकाल. शारीरिक व मानसिक स्वास्थ्य उत्तम राहील. नवीन कार्याचा आरंभ करू शकाल. धनसंचय होऊ शकेल.
मिथून -चंद्र आज मिथुन राशीत आहे. तो आपल्या राशी पासून प्रथम भावात असेल. आज आपले शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील. आप्तेष्टांच्या सहवासात वेळ घालवू शकाल. आर्थिक लाभ झाले तरी खर्चावर नियंत्रण ठेवावे लागेल. दुपार नंतर आर्थिक नियोजनात काही चूक झाली असल्याचे वाटेल. आर्थिक देवाण - घेवाणीच्या व्यवहारात सावध राहावे लागेल. नोकरीत सहकार्यांचे अपेक्षित सहकार्य लाभेल.
कर्क -चंद्र आज मिथुन राशीत आहे. तो आपल्या राशी पासून बारावा भावात असेल. आजचा दिवस प्राप्तीच्या प्रमाणात अधिक खर्च करण्याचा आहे. नेत्र विकार बळावतील. मानसिक चिंता वाढतील. कोणाशी वाद होऊ नयेत म्हणून आपल्या कृतींवर संयम ठेवा. दुपार नंतर परिस्थितीत बदल होईल. आर्थिक लाभ संभवतात. कौटुंबिक वातावरण चांगले राहील. मनातून नकारात्मक विचार दूर होऊ शकतील.
सिंह - चंद्र आज मिथुन राशीत आहे. तो आपल्या राशी पासून लाभात भावात असेल. आजची सकाळची वेळ फारच चांगली आहे. सामाजिक व व्यावसायिक क्षेत्रांत आनंददायक व लाभदायक बातम्या प्राप्त होतील. मित्रांकडून एखादी चांगली बातमी मिळू शकेल. धनलाभ होऊन प्राप्तीत वाढ होईल. दुपार नंतर आपल्या बोलण्यामुळे काही समस्या उदभवण्याची शक्यता आहे. अपघाताची शक्यता आहे. एखादी मानसिक चिंता सतावेल. कुटुंबीय व संतती यांच्याशी मतभेद होण्याचे प्रसंग घडतील. प्रकृतीस त्रास संभवतो.
कन्या -चंद्र आज मिथुन राशीत आहे. तो आपल्या राशी पासून दशमात भावात असेल. आजचा दिवस अनुकूलतेचा आहे. कुटुंबियांशी सलोखा राहील. आप्तेष्टांकडून भेटवस्तू मिळू शकतील. नोकरीत वरिष्ठ आपल्या कामावर खुश होतील. त्यामुळे आपण आनंददित व्हाल. दुपार नंतर आपली उक्ती आणि कृती यांमुळे काही समस्या उदभवण्याची शक्यता आहे. एखादा अपघात संभवतो. जवळपासच्या एखाद्या रमणीय स्थळी सहलीस जाल. विवाहेच्छुकांना योग्य जोडीदार मिळेल. मित्रांकडून लाभ होतील.