या राशीभविष्यात आपण जाणून घेणार आहोत की, आज कोणत्या राशीचे दैनंदिन जीवन चांगले राहील. सर्व 12 राशींचा दिवस कामाच्या ठिकाणी कसा जाईल. जोडीदाराची साथ कोणाला मिळेल, कुठे हात सोडता येतील. आजची कुंडली चंद्र राशीवर आधारित आहे. चला जाणून घेऊया तुमच्या जीवनाशी निगडित प्रत्येक गोष्ट जानेवारीच्या दैनिक कुंडलीत.
मेष : आज चंद्र मिथुन राशीस स्थित राहील. आपल्यासाठी चंद्र तिसरा स्थानी असेल. विचारांच्या गतिशीलतेमुळे द्विधा मनःस्थिती होईल व त्यामुळे कोणत्याही निर्णयाप्रत आपण येऊ शकणार नाही. आजचा दिवस नोकरी - व्यवसायात स्पर्धेचा राहील व त्यात यशस्वी होण्याचा आपण प्रयत्न कराल. त्यातून सुद्धा नवे कार्य सुरू करण्याची प्रेरणा मिळेल व ते सुरूही करता येईल. एखादा प्रवास संभवतो. आजचा दिवस लेखन कार्यास अनुकूल आहे. बौद्धिक व तार्किक विचार - विनिमय करण्यास संधी मिळेल.
वृषभ :आज चंद्र मिथुन राशीस स्थित राहील. आपल्यासाठी चंद्र दुसरा स्थानी असेल. आज द्विधा मनःस्थितीमुळे केलेल्या व्यवहारात आपण अडचणीत येऊ शकता. त्यातून बाहेर पडण्यासाठी महत्वाचा वेळ खर्च करावा लागेल. आपला हट्टी स्वभाव न सोडल्यास कोणाशी चर्च दरम्यान संघर्ष होऊ शकतो. आज आखलेला प्रवासाचा बेत पूर्ण होणार नाही किंवा रद्द करावा लागेल. आज लेखक, कारागीर व कलाकारांना आपली प्रतिभा व्यक्त करण्याची संधी मिळेल. आपल्या सुमधुर वाणीने एखाद्याची समजूत घालू शकाल. अनुकूल स्थिती नसताना नवीन कामाची सुरुवात न करणे हितावह राहील.
मिथुन :आज चंद्र मिथुन राशीस स्थित राहील. आपल्यासाठी चंद्र प्रथम स्थानी असेल. आजच्या दिवसाचा प्रारंभ शरीर व मनाच्या टवटवीतपणामुळे चांगला होईल. मित्र व कुटुंबीयांसह घरात किंवा बाहेर मनपसंत भोजनाचा आनंद लुटाल. सुंदर कपडे परिधान करून बाहेर जाल. आर्थिक लाभाची संधी आहे. मनात कोणत्याही प्रकारच्या नकारात्मक विचारांना थारा न देणे किंवा ते दूर करणे हितावह राहील. कोणत्याही परिस्थितीत मन संयमित ठेवा.
कर्क :आज चंद्र मिथुन राशीस स्थित राहील. आपल्यासाठी चंद्र बारावा स्थानी असेल. आजचा दिवस जास्त खर्च होण्याचा आहे. कौटुंबिक वातावरण पण फारसे समाधानकारक असणार नाही. कुटुंबियांशी मतभेद संभवतात. मनात निर्माण होणार्या अनिश्चिततेमुळे मानसिक अस्वास्थ्य राहील. मनःस्थिती द्विधा होईल. संभाव्य वाद टाळण्यासाठी बोलण्यावर संयम ठेवा. इतरांचे गैरसमज दूर केल्यामुळे प्रत्येक बाब लवकर पूर्ण होईल. आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. मान - प्रतिष्ठेस तडा जाण्याची शक्यता आहे.
सिंह :आज चंद्र मिथुन राशीस स्थित राहील. आपल्यासाठी चंद्र लाभात स्थानी असेल. कोणत्याही गोष्टीत खंबीर मनाने निर्णय घेऊ न शकल्याने समोरून आलेल्या संधीचा फायदा उठवता येणार नाही. मन विचारांत अडकून पडेल. मित्रांकडून व विशेषतः स्त्रीवर्गाकडून लाभ होईल. व्यापारात फायदा होईल. मनःस्थिती चांगली नसल्याने महत्त्वाचे निर्णय आज घेऊ नये. संततीशी चर्चा होईल. स्वादिष्ट भोजनाचा लाभ मिळेल.