महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

DAILY HOROSCOPE : 'या' राशींच्या व्यक्तींनी विचारांमध्ये न अडकता निर्णय घ्यावा, वाचा, शनिवारचे राशीभविष्य - 07 जानेवारी 2023

07 जानेवारी 2023 रोजी जन्मकुंडलीतील आजच्या भाग्यशाली राशीची चिन्हे जाणून घ्या. कसा असेल तुमचा आजचा दिवस, कशी राहील नोकरी, प्रेम, विवाह, व्यवसाय अशा आघाड्यांवर ग्रहस्थिती! तुमच्या जोडीदारासोबतचा दिवस कसा जाईल, सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी 'ई टिव्ही' भारतवर वाचा, आजचे राशीभविष्य. 07 JANUARY 2023 . Horoscope For The Day 07 January 2023 . Tomorrow Rashi Bhavishya. Saturday Rashi Bhavishya

DAILY HOROSCOPE
शनिवारचे राशीभविष्य

By

Published : Jan 7, 2023, 1:35 AM IST

या राशीभविष्यात आपण जाणून घेणार आहोत की, आज कोणत्या राशीचे दैनंदिन जीवन चांगले राहील. सर्व 12 राशींचा दिवस कामाच्या ठिकाणी कसा जाईल. जोडीदाराची साथ कोणाला मिळेल, कुठे हात सोडता येतील. आजची कुंडली चंद्र राशीवर आधारित आहे. चला जाणून घेऊया तुमच्या जीवनाशी निगडित प्रत्येक गोष्ट जानेवारीच्या दैनिक कुंडलीत. 07 January 2023 . Horoscope For The Day 07 JANUARY 2023 . Rashi Bhavishya. Saturday Rashi Bhavishya

मेष : आज चंद्र मिथुन राशीस स्थित राहील. आपल्यासाठी चंद्र तिसरा स्थानी असेल. विचारांच्या गतिशीलतेमुळे द्विधा मनःस्थिती होईल व त्यामुळे कोणत्याही निर्णयाप्रत आपण येऊ शकणार नाही. आजचा दिवस नोकरी - व्यवसायात स्पर्धेचा राहील व त्यात यशस्वी होण्याचा आपण प्रयत्न कराल. त्यातून सुद्धा नवे कार्य सुरू करण्याची प्रेरणा मिळेल व ते सुरूही करता येईल. एखादा प्रवास संभवतो. आजचा दिवस लेखन कार्यास अनुकूल आहे. बौद्धिक व तार्किक विचार - विनिमय करण्यास संधी मिळेल.

वृषभ :आज चंद्र मिथुन राशीस स्थित राहील. आपल्यासाठी चंद्र दुसरा स्थानी असेल. आज द्विधा मनःस्थितीमुळे केलेल्या व्यवहारात आपण अडचणीत येऊ शकता. त्यातून बाहेर पडण्यासाठी महत्वाचा वेळ खर्च करावा लागेल. आपला हट्टी स्वभाव न सोडल्यास कोणाशी चर्च दरम्यान संघर्ष होऊ शकतो. आज आखलेला प्रवासाचा बेत पूर्ण होणार नाही किंवा रद्द करावा लागेल. आज लेखक, कारागीर व कलाकारांना आपली प्रतिभा व्यक्त करण्याची संधी मिळेल. आपल्या सुमधुर वाणीने एखाद्याची समजूत घालू शकाल. अनुकूल स्थिती नसताना नवीन कामाची सुरुवात न करणे हितावह राहील.

मिथुन :आज चंद्र मिथुन राशीस स्थित राहील. आपल्यासाठी चंद्र प्रथम स्थानी असेल. आजच्या दिवसाचा प्रारंभ शरीर व मनाच्या टवटवीतपणामुळे चांगला होईल. मित्र व कुटुंबीयांसह घरात किंवा बाहेर मनपसंत भोजनाचा आनंद लुटाल. सुंदर कपडे परिधान करून बाहेर जाल. आर्थिक लाभाची संधी आहे. मनात कोणत्याही प्रकारच्या नकारात्मक विचारांना थारा न देणे किंवा ते दूर करणे हितावह राहील. कोणत्याही परिस्थितीत मन संयमित ठेवा.

कर्क :आज चंद्र मिथुन राशीस स्थित राहील. आपल्यासाठी चंद्र बारावा स्थानी असेल. आजचा दिवस जास्त खर्च होण्याचा आहे. कौटुंबिक वातावरण पण फारसे समाधानकारक असणार नाही. कुटुंबियांशी मतभेद संभवतात. मनात निर्माण होणार्‍या अनिश्चिततेमुळे मानसिक अस्वास्थ्य राहील. मनःस्थिती द्विधा होईल. संभाव्य वाद टाळण्यासाठी बोलण्यावर संयम ठेवा. इतरांचे गैरसमज दूर केल्यामुळे प्रत्येक बाब लवकर पूर्ण होईल. आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. मान - प्रतिष्ठेस तडा जाण्याची शक्यता आहे.

सिंह :आज चंद्र मिथुन राशीस स्थित राहील. आपल्यासाठी चंद्र लाभात स्थानी असेल. कोणत्याही गोष्टीत खंबीर मनाने निर्णय घेऊ न शकल्याने समोरून आलेल्या संधीचा फायदा उठवता येणार नाही. मन विचारांत अडकून पडेल. मित्रांकडून व विशेषतः स्त्रीवर्गाकडून लाभ होईल. व्यापारात फायदा होईल. मनःस्थिती चांगली नसल्याने महत्त्वाचे निर्णय आज घेऊ नये. संततीशी चर्चा होईल. स्वादिष्ट भोजनाचा लाभ मिळेल.

कन्या : आज चंद्र मिथुन राशीस स्थित राहील. आपल्यासाठी चंद्र दशमात स्थानी असेल. सांप्रतकाली नव्या कामा संदर्भातील नियोजन योग्य प्रकारे करू शकाल. व्यापारी व नोकरी करणार्यांना आजचा दिवस लाभदायी आहे. वरिष्ठांची मर्जी संपादन करता आल्यामुळे बढती मिळण्याची शक्यता आहे. व्यापारात लाभ संभवतो. कौटुंबिक जीवनात आनंदाचे वातावरण राहील. कौटुंबिक जिव्हाळा वाढेल. पित्याकडून लाभ होण्याची शक्यता आहे.

तूळ : आज चंद्र मिथुन राशीस स्थित राहील. आपल्यासाठी चंद्र भाग्यात स्थानी असेल. आज नोकरीच्या ठिकाणी आपणास वरिष्ठांच्या नाराजीला सामोरे जावे लागेल. संतती विषयक काळजी वाटेल. दूरवरच्या प्रवासाचे नियोजन कराल. एखादा प्रवास संभवतो. लेखन व साहित्य निर्मिती होईल. प्रतिस्पर्ध्यांशी वादविवाद संभवतात.

वृश्चिक : आज चंद्र मिथुन राशीस स्थित राहील. आपल्यासाठी चंद्र अष्टमात स्थानी असेल. सध्या शांत राहून वेळ घालवावा लागेल. रागावर नियंत्रण ठेवावे लागेल. अवैध कामां पासून दूर राहावे. नवे संबंध विचारपूर्वक प्रस्थापित करा. जास्त पैसे खर्च झाल्याने आर्थिक चणचण भासेल. काम वेळेवर पूर्ण होणार नाही. खाण्या- पिण्या विषयी काळजी घ्यावी लागेल. शारीरिक व मानसिक बेचैनी जाणवेल. शांती लाभण्यासाठी प्रयत्नशील राहावे लागेल.

धनु : आज चंद्र मिथुन राशीस स्थित राहील. आपल्यासाठी चंद्र सातवा स्थानी असेल. आजचा दिवस बौद्धिक व तार्किक विचार - विनिमयासाठी अनुकूल आहे. सामाजिक सन्मान होतील. मित्रांचा सहवास लाभेल. त्यांच्यासह एखाद्या सहलीस जाऊ शकाल. स्वादिष्ट भोजन व सुंदर वस्त्र लाभल्याने मन प्रसन्न राहील. शारीरिक स्वास्थ्य उत्तम राहील. भिन्नलिंगी वक्तींच्या सहवासात वेळ चांगला जाऊ शकेल. भागीदारी लाभदायी होईल.

मकर :आज चंद्र मिथुन राशीस स्थित राहील. आपल्यासाठी चंद्र सहावा स्थानी असेल. व्यापारातील प्रगतीसाठी आजचा दिवस लाभदायी आहे. व्यवसायात आपण ठरविल्या प्रमाणे काम करु शकाल. आर्थिक देवाण - घेवाणीत सुद्धा यश मिळवू शकाल. व्यापारी कामात विघ्न येईल. स्वास्थ्य उत्तम राहील. घरात सुख - शांतीचे वातावरण राहील. सहकार्यांचे अपेक्षित सहकार्य सुद्धा मिळवू शकाल.

कुंभ : आज चंद्र मिथुन राशीस स्थित राहील. आपल्यासाठी चंद्र पाचवा स्थानी असेल. आपले विचार व बोलणे ह्यात बदल होईल. बौद्धिक चर्चेत सहभागी होऊ शकाल. लेखन व सृजनात्मकता ह्यातून आनंद मिळेल. अचानक खर्च उदभवतील. अपचन व अजीर्ण अशा आजारातून स्वास्थ्य बिघडू शकते.

मीन : चंद्र वृषभ राशीस स्थित आहे. आपल्या राशी पासून चंद्र तिसरा स्थानी असेल. आज आपली काळजी दूर झाल्याचे जाणवेल. आनंद व उत्साहात वाढ होईल. कौटुंबिक व आर्थिक बाबींकडे जास्त लक्ष देऊ शकाल. खंबीर मन व पूर्ण आत्मविश्वासाने एखादे कार्य पूर्ण करू शकाल. वडिलोपार्जित संपत्तीतून लाभ होण्याची शक्यता आहे. संततीसाठी खर्च करावा लागेल. विद्यार्थ्यांना अभ्यासात मोठे यश लाभेल. Tomorrow Rashi Bhavishya

ABOUT THE AUTHOR

...view details