यास चक्रीवादळामुळे पश्चिम बंगालमध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू झाला आहे. बंगालसोबतच ओडिशा आणि आंध्र प्रदेशलाही मोठ्या प्रमाणात पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
Cyclone Yaas LIVE Updates : वादळाची तीव्रता वाढली; किनारपट्टी भागातील लोकांचे स्थलांतर करण्यास सुरुवात - West Bengal Cyclone
![Cyclone Yaas LIVE Updates : वादळाची तीव्रता वाढली; किनारपट्टी भागातील लोकांचे स्थलांतर करण्यास सुरुवात Cyclone Yaas: Locals evacuated to shelter homes in Odisha's Jagatsinghpur](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-11886874-636-11886874-1621907477630.jpg)
11:50 May 25
पश्चिम बंगालमध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस..
11:48 May 25
पश्चिम बंगालच्या किनारी मोठ्या लाटा..
पश्चिम बंगालच्या समुद्रकिनारी यास चक्रीवादळामुळे उंच लाटा येत आहेत. याठिकाणी खबरदारी म्हणून एसडीआरएफ आणि एनडीआरएफची पथके तैनात करण्यात आली आहेत.
09:01 May 25
यास चक्रीवादळ 'तीव्र'; काही तासांमध्ये 'अतीतीव्र' होण्याची शक्यता..
यास चक्रीवादळ हे सोमवारी तीव्र प्रकारात गेले. यानंतर पुढील १२ तासांमध्ये वादळाची तीव्रता आणखी वाढून ते 'अतीतीव्र' प्रकारात जाण्याची शक्यता आहे. आतापर्यंत ओडिशाच्या किनारी भागातील सुमारे १५ हजार लोकांचे स्थलांतर करण्यात आल्याची माहिती प्रशासनाने दिली. आज किनाऱ्यावरील संपूर्ण लोकांचे स्थलांतर होण्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे.
सध्या हे चक्रीवादळ ९ किलोमीटर प्रतितास वेगाने प्रवास करत आहे. मंगळवारी पहाटे हे प्रदीप आणि बालासोर पासून अनुक्रमे ३६० आणि ४६० किलोमीटर अंतरावर होते.
08:50 May 25
किनारपट्टी भागातील लोकांचे स्थलांतर करण्यास सुरुवात..
कोलकाता/भुवनेश्वर :पश्चिम बंगाल आणि ओडिशाच्या किनाऱ्यावर यास (यश) चक्रीवादळ धडकणार असून, यामुळे बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. हे चक्रीवादळ काही तासांमध्ये तीव्र चक्रीवादळात रुपांतरित होणार असल्याची माहिती हवामान खात्याने दिली आहे. या पार्श्वभूमीवर देशाची पूर्व किनारपट्टी सज्ज झाली आहे.
ओडिशा आणि बंगाल प्रशासनाने किनारपट्टी भागातील लोकांचे स्थलांतर करण्यास सुरुवात केली आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार 26 मे रोजी हे चक्रीवादळ वादळ देशाच्या पश्चिम किनारपट्टीच्या राज्यांना धडकेल. यास वादळाचा सर्वाधिक परिणाम अंदमान आणि निकोबार बेटे, ओडिशा आणि पश्चिम बंगालवर होईल. या राज्यात जोरदार वाऱ्यासह पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
देशभरातून एनडीआरएफचे जवान किनारी भागात नेले..
एनडीआरएफने आपल्या सुमारे ९५० जवानांना देशातील विविध ठिकाणांहून एअरलिफ्ट करुन, बंगाल आणि ओडिशाच्या किनारी भागात तैनात केले आहे. याठिकाणी २६ हेलिकॉप्टरही स्टँडबाय मोडवर ठेवण्यात आले आहेत. जामनगर, वाराणसी, पटना आणि अराकोन्नमहून कोलकाता, भुवनेश्वर आणि पोर्ट ब्लेअरमध्ये सुमारे ७० टन साहित्य आणण्यात आले असल्याची माहितीही लष्कराने दिली.
सुमारे ८००हून अधिक ओडीआरएएफ कर्मचारी टॉवर लाईट, सर्च लाईट, जेनसेट्स, जेसीबी, हायड्रा क्रेन्स, इन्फ्लेटेबल बोट्स, हायड्रॉलिक ट्री कटर्स, गॅस कटर्स, प्लाज्मा कटर्स, सॅटेलाईट फोन्स आणि वॉकीटॉकी अशा साहित्यासह येणाऱ्या आपत्तीला तोंड देण्यासाठी सज्ज असल्याची माहिती लष्कराने दिली.