नवी दिल्ली : पूर्व-मध्य अरबी समुद्रावर असलेले अतिशय तीव्र चक्रीवादळ (VSCS) "बिपरजॉय" ताशी 5 किमी वेगाने उत्तरेकडे सरकले आहे. पुढील 6 तासात हे चक्रीवादळ अत्यंत तीव्र रुप धारण करणार असल्याचे भारतीय हवामानशास्त्र विभागाने सांगितले आहे. तर महाराष्ट्रातील मुंबईसाठी शनिवारचा दिवस आहे उष्ण दिवस राहिला. शनिवारी जून महिन्यातील एका दशकातील सर्वात उष्ण दिवस मुंबईने शनिवारी अनुभवला. जून महिन्यात वातावरणात गारवा असतो. परंतु शनिवारी मुंबईकारांना खूप घाम सुटला होता. मुबंईतील तापमान 38.5 अंश नोंदवले गेले. पावसाचे गार थेंब अंगावर घेण्याच्या दिवसात मुंबईकरांचे रुमाल घामाने ओले झाले. मुंबईकरांना वर्ष 2014 मध्ये 11 जून रोजी मुंबईतील 38 अंश इतके उच्च नोंदवले गेले होते. दरम्यान दक्षिणेकडील वाऱ्यांमुळे तापमानात वाढ होत असते, असे भारतीय हवामानशास्त्र विभागाने सांगितले.
गुजरात किनारपट्टीवरील समुद्र खवळणार : पाकिस्तान आणि सौराष्ट्र तसेच कच्छ किनारपट्टीजवळ आल्यानंतर 15 जूनपर्यंत पोहोचेल. त्यावेळी बिपरजॉय हे तीव्र रुप धारण करेल. दरम्यान, बिपरजॉय हे चक्रीवादळ मुंबईपासून 530 किमी असून ते पश्चिमेकडून संथ गतीने प्रवास करत आहे. येत्या 24 तासात बिपरजॉय हे ईशान्यकडे प्रवास करु शकते. गुजरात किनारपट्टीवर 11 ते 15 जून या काळात समुद्र खवळलेला असेल असा अंदाज आहे. पूर्व-मध्य अरबी समुद्रावरील अतिशय तीव्र चक्री वादळ "बिपरजॉय" मागील काळात 5 किमी प्रतितास वेगाने जवळजवळ उत्तरेकडे सरकरणार आहे. पुढील 6 तासांत चक्रीवादळ अत्यंत तीव्र रुप धारण करणार असल्याची शक्यता आहे. ते जवळजवळ उत्तरेकडे सरकून 15 जून 2023 रोजी दुपारच्या सुमारास पाकिस्तान आणि लगतच्या सौराष्ट्र आणि कच्छ किनारपट्टीजवळ पोहोचण्याची शक्यता आहे. दरम्यान कराची पोर्ट ट्रस्टने (KPT) पूर्व-मध्य अरबी समुद्रावरील अत्यंत तीव्र चक्रीवादळ (VSCS) बिपरजॉयने तीव्रता कायम ठेवल्याने ‘रेड अलर्ट’ जारी केला आहे. हे चक्रीवादळ दक्षिणेपासून अंदाजे 900 किलोमीटर आहे, असा अंदाज वर्तवला आहे.