मुंबई : राज्य सरकारने गुजरातच्या 8 किनारी जिल्ह्यांमधून 74 हजारहून अधिक लोकांना बाहेर काढले आहे. यात कच्छ जिल्ह्याच्या किनारपट्टीवरील 35 हजार 822 लोकांचा समावेश आहे. येथील सार्वजनिक वाहतूक बंद केली आहे आणि लोकांना बुधवारी घरामध्येच राहण्याचा सल्ला दिला आहे. कच्छ जिल्ह्यात सांयकाळी 5 वाजता चक्रीवादळ बिपरजॉय धडकण्याची शक्यता आहे. मुंबईचा समुद्र खवळला असून समुद्रात उंच लाटा उसळत आहेत. खबरदारी म्हणून मुंबईच्या सर्व चौपाट्या आणि सी-फेस परिसर बंद करण्यात आला आहे. चक्रीवादळाच्या येऊ घातलेल्या पार्श्वभूमीवर भारतीय हवामान विभागाने (IMD) सौराष्ट्र-कच्छ किनारपट्टीसाठी रेड अलर्ट जारी केला आहे. येथे या वादळाचा लँडफॉल होणार असल्याचे सांगितले जात आहे.
बिपरजॉय चक्रीवादळ सौराष्ट्राकडे सरकू लागले आहे. जाखाऊपासून सुमारे 180 अंतरावर हे चक्रीवादळ आहे. वाऱ्याचा वेग हा 125 ते 135 किमी आहे - मृत्यूंजय महापात्रा, हवामान विभागाचे संचालक
येथे होणार लँडफॉल : भारतीय हवामान विभागाने (IMD) सौराष्ट्र-कच्छ किनारपट्टीसाठी रेड अलर्ट जारी केला आहे. येथे या वादळाचा लँडफॉल होणार असल्याचे सांगितले जात आहे. बिपरजॉय चक्रीवादळ सकाळी साडेपाच वाजता जाखाऊ बंदराच्या पश्चिम-नैऋत्येस 180 किमी अंतरावर होते. चक्रीवादळ मांडवी आणि कराची दरम्यान जखाऊमध्ये लँडफॉल करू शकते. यादरम्यान 150 किमी वेगाने वारे वाहत असून मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हे चक्रीवादळ अतिशय तीव्र अशून यामुळे झाडे, छोटी घरे, माती, पत्र्यांच्या घरांची पडझड होऊ शकते. दरम्यान लँडफॉल झाल्यानंतर जोराने वाहणारे वारे बंद होतील. साधरण रात्री 10 वाजेनंतर हे जोराचे वारे बंद होण्याची शक्यता आहे.
जखाऊ आहे एक बंदर : गुजराच्या समुद्रापर्यंत किनारपट्टीवर वसलेले जखाऊ हे गाव आहे. हे गाव कच्छ जिल्ह्यातील वसलेले आहे. या ठिकाणी एक बंदर आहे, गावाच्या नावावरुन या बंदराला जखाऊ हे नाव देण्यात आले आहे. हे बंदर कच्छ जिल्ह्यातील अब्दासा येथे आहे. 300-400 वर्षांपूर्वी जखाऊ बंदर अतिशय महत्त्वाचे होते. कच्छमधील कांडला आणि गांधीधाम बंदराच्या विकास झाल्यानंतर जखाऊ बंदरावरील काम हळूहळू कमी होत गेले आहे. येथे खूप कमी वाहतूक होते. आता हे फक्त मच्छिमारांचे गाव आहे. त्यांची लोकसंख्या साडेपाच हजारांच्या जवळपास आहे.
अतिशय तीव्र चक्रीवादळ : हे चक्रीवादळ अतिशय तीव्र चक्रीवादळ आहे. गुजरातच्या इतिहासातील सर्वात भयंकर चक्रीवादळ म्हणून नोंदले गेले आहे. गुजरातमध्ये याआधी 1998 ला आलेले चक्रीवादळ आतापर्यंतचे सर्वात भयानक चक्रीवादळ होते. यामुळे कांडला बंदराचे मोठे नुकसान झाले होते. दरम्यान आता तशी भीती नाही, कारण येथील वाहतूक बंद असून हा एक मोकळा परिसर आहे. बिपरजॉय चक्रीवादळ किती भयंकर आहे, याचा अंदाज आपल्याला त्याच्या लँडफॉवरुन लावता येईल. चक्रीवादळाचा लँडफॉल कराची आणि मांडवी दरम्यान होणार आहे यावरुन याचा अंदाज लावता येतो. कराची ते मांडवी हे समुद्रमार्गे 321 किलोमीटर अंतर आहे. तर कराची ते जखाऊ हे अंतर २५२ किलोमीटर आहे.
मुंबई महानगरपालिकेच्यावतीने खबरदारी : मुंबईच्या समुद्रकिनारी मोठी खबरदारी घेतली जात आहे. मुंबईतील समुद्र खवळला असून तेथील सर्व चौपाट्या बंद करण्यात आल्या आहेत. चौपाट्यांवर नागरीक मोठ्या प्रमाणात जात असतात, त्यांनी पोहण्यासाठी किंवा इतर कोणत्यास कारणासाठी समुद्रात जाऊ नये, यासाठी मुंबई महानगरपालिकेकडून खबरदारी घेतली जात आहे. मुंबईला 145 किलोमीटर लांबीचा समुद्र किनारा लाभला आहे. यादरम्यान गिरगाव, दादर, जुहू, वर्सोवा, आक्सा, आणि गोराई या चौपाट्या आहेत. या चौपाट्या बंद करण्यात आल्या आहेत. या चौपाट्यांवर सुरक्षा रक्षक तैनात करण्यात आले आहेत.
हेही वाचा -
- Cyclone Beeperjoy: 'बिपरजॉय' चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर गेटवे परिसरात सुरक्षा तैनात
- Cyclone Biparjoy Updates: गुजरातच्या दिशेने वेगाने जाणाऱ्या चक्रीवादळाचा वाढला धोका; सुरक्षेसाठी कांडला बंदरासह १९ रेल्वे बंद
- cyclone Biparjoy: बिपोरजॉय चक्रीवादळाची तीव्रता वाढली, गेट वे परिसरात उसळल्या तुफान लाटा