महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Hit And Dragged In Delhi : दिल्लीत पुन्हा हिट अँड ड्रॅगचा थरार, कारने सायकल रिक्षा चालकाला 200 मिटर नेले फरफटत! - हिट अँड ड्रॅगचे प्रकरण

दिल्लीत पुन्हा एकदा कंझावाला सारखी घटना घडली आहे. मंगळवारी सायंकाळी दिल्लीतील फिरोजशहा रोडवर कार चालकाने सायकल रिक्षाला जोरदार धडक दिली. धडक दिल्यानंतर कार चालकाने रिक्षा चालकाला फरफटत नेले.

Hit And Dragged In Delhi
घटनास्थळावरील कार

By

Published : Apr 26, 2023, 8:24 AM IST

नवी दिल्ली : देशाच्या राजधानीत पुन्हा एकदा हिट अँड ड्रॅगचे प्रकरण उघड झाल्याने खळबळ उडाली आहे. फिरोजशाह रोडवर मंगळवारी सायंकाळी हिट अँड ड्रॅगचे हे प्रकरण समोर आले आहे. भरधाव वेगातील कार चालकाने सायकल रिक्षाला जोरदार धडक दिली. यामुळे सायकल रिक्षाचालक कारमध्ये अडकून सुमारे 200 मीटरपर्यंत फरफटत गेला. दिल्लीतील या अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून आरोपी कार चालकाला अटक केली. तर जखमी सायकल रिक्षा चालकाला आरएमएल रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्याची प्रकृती चिंताजनक आहे. फरमान असे आरोपी कार चालकाचे नाव आहे.

कारच्या बोनेटमध्ये अडकला रिक्षाचालक :मंगळवारी सायंकाळी उशिरा फिरोजशहा रोडवर भरधाव वेगात आलेल्या कारने सायकल रिक्षाला धडक दिली. यामुळे रिक्षाचालक कारच्या बोनेटमध्ये अडकला आणि सुमारे 200 मीटरपर्यंत कारसह ओढला गेला. कार थांबल्यावर नागरिकांनी कार चालकाला पकडून पोलिसांना माहिती दिली. मुरादनगर येथील फरमान असे आरोपी कार चालकाचे नाव असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. चालक दारूच्या नशेत होता का याचा तपास पोलीस करत आहेत. कार चालकाविरुद्ध या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सुरू करण्यात आला आहे. मात्र दिल्लीत हिट अँड रनच्या थरारक घटनेनंतर आता हिट अँड ड्रॅगची घटना घडल्याने खळबळ उडाली आहे.

राजधानीत घडले होते हिट अँड रन प्रकरण :देशाची राजधानी दिल्लीत या वर्षी 1 जानेवारीला कांजवाला येथे हिट अँड रन प्रकरण उघडकीस आले होते. या हिट अँड रन प्रकरणात अंजली नावाच्या मुलीला कारने धडक दिल्यानंतर आरोपींनी तिला अनेक किलोमीटरपर्यंत फरफटत नेले होते. अंजली बोनेटमध्ये अडकल्याचेही आरोपींना माहीत होते. मात्र तरीही त्यांनी वाहन थांबवले नसल्याने अंजलीचा मृत्यू झाला होता. मात्र त्यानंतर हे प्रकरण उघडकीस आल्याने देशभरात खळबळ उडाली होती. याबाबत दिल्लीत बराच गोंधळ झाल्यानंतर दिल्लीत कायदा व सुव्यवस्थेचा पुरता फज्जा उडाल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात आला होता.

हेही वाचा - New Delhi Crime News : मॅट्रीमोनियल साईटवरून तब्बल 700 तरुणींची फसवणूक, दोन नायजेरियन भामट्यांना अटक

ABOUT THE AUTHOR

...view details