बर्मिंगहॅम :राष्ट्रकुल क्रीडा 2022 ( CWG 2022 )स्पर्धेतील शेवटच्या दिवशी बॅडमिंटनमध्ये भारतीय जोडीने इंग्लंडच्या जोडीला हरवून सुवर्णपदक पटकावले आहे. भारताच्या सात्विक-चिराग जोडीने हा सामना 21-15, 21-13 अशा फरकाने जिंकला ( Satwik Chirag pair won gold medal ). त्यामुळे भारताच्या खात्यात आणखी एका सुवर्णपदकाची भर पडली आहे. आता भारतीय संघाच्या खात्यात 21 सुवर्णपदकांची नोंद झाली आहे.
CWG 2022 : सात्विक-चिराग जोडीने बॅडमिंटनमध्ये जिंकले सुवर्णपदक; इंग्लंडच्या जोडीवर केली मात - चिराग शेट्टी
सात्विक साईराज आणि चिराग शेट्टी ( Satwik Sairaj and Chirag Shetty Pair ) या जोडीने आज भारताला बॅडमिंटनमध्ये तिसरे सुवर्णपदक मिळवून दिले आहे. भारतीय जोडीने हा सामना 21-15, 21-13 असा जिंकला
Satwik Sairaj
भारताचे पदक विजेते -
- 21 सुवर्ण: मीराबाई चानू, जेरेमी लालरिनुंगा, अंचिता शेउली, महिला लॉन बॉल फेडरेशन, टीटी पुरुष संघ, सुधीर, बजरंग पुनिया, साक्षी मलिक, दीपक पुनिया, रवी दहिया, विनेश, नवीन, भाविना, नीतू, अमित पंघल, नीतुस पंघल. जरीन, शरथ-श्रीजा, पीव्ही सिंधू, लक्ष्य सेन, आणि सात्विक-चिराग.
- 15 रौप्य: संकेत सरगर, बिंदियाराणी देवी, सुशीला देवी, विकास ठाकूर, बॅडमिंटन असोसिएशन ऑफ इंडिया, तुलिका मान, मुरली श्रीशंकर, अंशू मलिक, प्रियंका, अविनाश साबळे, पुरुष लॉन बॉल असोसिएशन, अब्दुल्ला अबोबाकर, शरथ-साथियान, महिला क्रिकेट संघ, सागर.
- 23 कांस्य:गुरुराजा, विजय कुमार यादव, हरजिंदर कौर, लवप्रीत सिंग, सौरव घोषाल, गुरदीप सिंग, तेजस्वी शंकर, दिव्या काकरन, मोहित ग्रेवाल, जस्मिन, पूजा गेहलोत, पूजा सिहाग, मोहम्मद हुसामुद्दीन, दीपक नेहरा, रोहित टोक्स, महिला संघ. संदीप कुमार, अन्नू राणी, सौरव-दीपिका, किदाम्बी श्रीकांत, त्रिशा-गायत्री, जी साथियान.