बर्मिंगहॅम : भारताची पॅरा टेबल टेनिसपटू भाविना पटेल हिने शनिवारी येथे राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत महिला एकेरीच्या 3-5 वर्गात सुवर्णपदक पटकावले. त्याचबरोबर सोनलबेन मनुभाई पटेलने कांस्यपदक जिंकले आहे. टोकियो पॅरालिम्पिक रौप्यपदक विजेत्या भाविनाने ( Tennis player Bhavina Patel won gold medal ) येथे झालेल्या अंतिम फेरीत नायजेरियाच्या ख्रिस्तियाना इक्पेओईचा 12-10, 11-2, 11-9 असा पराभव केला. अशा पद्धतीने भारतीय संघाची राष्ट्रकुल क्रीडा 2022 ( CWG 2022 ) मधील पदकांची घोडदौड कायम आहे.
CWG 2022 Para Table Tennis : भाविना पटेलने सुवर्ण, तर सोनलबेनने जिंकले कांस्यपदक - क्रिडाच्या न्यूज
भाविना पटेलने कॉमनवेल्थ गेम्स 2022, पॅरा टेबल टेनिस महिला एकेरी प्रकारात सुवर्णपदक ( Bhavina Patel won gold medal ) जिंकले. त्याचवेळी सोनलबेन मनुभाई पटेल हिने कांस्यपदक पटकावले.
तत्पूर्वी, चौतीस वर्षीय सोनलबेनने कांस्यपदकाच्या ( Sonalben Manubhai Patel won bronze medal ) प्ले-ऑफमध्ये इंग्लंडच्या स्यू बेलीचा 11-5, 11-2, 11-3 असा पराभव केला. मात्र, राज अरविंदन अलागरला पुरुष एकेरीच्या 'क्लास 3-5' कांस्यपदकाच्या प्ले-ऑफमध्ये नायजेरियाच्या इसाऊ ओगुनकुन्लेकडून पराभव पत्करावा लागला. भारतीय खेळाडूचा 3-11, 6-11, 9-11 असा पराभव झाला.
हेही वाचा -IND vs WI 4th T20I : चौथ्या सामन्यात भारताने 59 धावांनी शानदार विजय, मालिकेत 3-1 ची विजयी आघाडी