बर्मिंगहॅम: 2022 च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताला आणखी एक कांस्यपदक मिळाले आहे. वेटलिफ्टर लवप्रीत सिंगने बुधवारी 109 किलो वजनी गट जिंकला. त्याने या प्रकारात आश्चर्यकारक कामगिरी करत देशाच्या नावावर कांस्यपदक मिळवले ( Lovepreet Singh wins bronze medal in weightlifting ). भारताचे आतापर्यंतचे हे 14 वे पदक आहे, तर हे चौथे कांस्य पदक आहे. लवप्रीत सिंगने या गेममध्ये एकूण 355 (163+192) किलो वजन उचलले. वजन उचलणे, हा राष्ट्रीय विक्रम आहे. लवप्रीत सिंगने स्वतःचाच विक्रम मोडला आहे.
असा इतिहास रचला लवप्रीत सिंगने -
लवप्रीत सिंगने ( Weightlifter Lovepreet Singh ) स्नॅच राऊंडमध्ये शानदार कामगिरी केली आणि तिन्ही प्रयत्नांमध्ये तो यशस्वी ठरला. त्याने स्नॅच फेरीत अनुक्रमे 157 किलो, 161 किलो आणि 163 किलो वजन उचलले. यानंतर लवप्रीतने क्लीन अँड जर्क फेरीतही तिन्ही प्रयत्न यशस्वी केले आणि अनुक्रमे 185 किलो, 189 किलो, 192 किलो वजन उचलले. अशाप्रकारे लवप्रीतने एकूण 355 किलो (163 + 192) वजन उचलले.
लवप्रीत सिंगने क्लीन अँड जर्कची शेवटची फेरी पूर्ण केली तोपर्यंत तो अव्वल होता, पण नंतर इतर खेळाडूंनी त्याला मागे टाकले. एका क्षणी, खेळाच्या शेवटी, लवप्रीत तिसऱ्या क्रमांकावर आला आणि कांस्यपदक त्याच्या नावावर झाले. या सामन्यात कॅमेरूनच्या खेळाडूने सुवर्णपदक जिंकले, त्याने 361 किलो वजन उचलले. तर समुआच्या खेळाडूने 358 किलो वजन उचलून रौप्यपदक जिंकले.
हेही वाचा -Suryakumar Yadav : सूर्यकुमार यादव हिसकावणार बाबर आझमचा मुकुट, काय आहे कारण, घ्या जाणून