बर्मिंगहॅम: हॉकीमध्ये भारतीय पुरुष संघाला ऑस्ट्रेलियाविरुद्ध 7-0 अशा फरकाने पराभव स्वीकारावा लागला आहे. या पराभवामुळे टीम इंडियाने सुवर्ण जिंकण्याची संधी गमावली आणि रौप्य पदकासह आपल्या अभियानाचा शेवट ( Indian mens hockey team won silver medal ) केला. 2022 च्या राष्ट्रकुल क्रीडा ( CWG 2022 ) स्पर्धेत भारताने एकूण 61 पदकांची कमाई केली आहे.
CWG 2022 : हॉकीमधील रौप्य पदकाने भारताच्या मोहिमेचा झाला समारोप; 22 सुवर्णांसह जिंकली एकूण 61 पदके - Commonwealth Games 2022 india
भारतीय हॉकी संघाचा ऑस्ट्रेलियाविरुद्ध 0-7 असा पराभव ( Indian mens hockey team lost ) झाला. अशाप्रकारे ऑस्ट्रेलिया सलग सातव्यांदा चॅम्पियन ठरला. त्याचवेळी भारताला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. राष्ट्रकुल स्पर्धेतील भारताचे हे तिसरे पदक ( Indias third medal in CWG 2022 ) आहे.
Indian mens hockey team
2022 च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील भारताचे पदक विजेते -
- 22 सुवर्ण: मीराबाई चानू, जेरेमी लालरिनुंगा, अंचिता शेउली, महिला लॉन बॉल फेडरेशन, टीटी पुरुष संघ, सुधीर, बजरंग पुनिया, साक्षी मलिक, दीपक पुनिया, रवी दहिया, विनेश, नवीन, भाविना, नीतू, अमित पंघल, नीतुस पंघल. जरीन, शरथ-श्रीजा, पीव्ही सिंधू, लक्ष्य सेन, आणि सात्विक-चिराग आणि अचंता शरथ कमल.
- 16 रौप्य:संकेत सरगर, बिंदियाराणी देवी, सुशीला देवी, विकास ठाकूर, बॅडमिंटन असोसिएशन ऑफ इंडिया, तुलिका मान, मुरली श्रीशंकर, अंशू मलिक, प्रियंका, अविनाश साबळे, पुरुष लॉन बॉल असोसिएशन, अब्दुल्ला अबोबाकर, शरथ-साथियान, महिला क्रिकेट संघ, सागर आणि भारतीय पुरुष हॉकी संघ.
- 23 कांस्य: गुरुराजा, विजय कुमार यादव, हरजिंदर कौर, लवप्रीत सिंग, सौरव घोषाल, गुरदीप सिंग, तेजस्वी शंकर, दिव्या काकरन, मोहित ग्रेवाल, जस्मिन, पूजा गेहलोत, पूजा सिहाग, मोहम्मद हुसामुद्दीन, दीपक नेहरा, रोहित टोक्स, महिला संघ. संदीप कुमार, अन्नू राणी, सौरव-दीपिका, किदाम्बी श्रीकांत, त्रिशा-गायत्री आणि जी साथियान.
हेही वाचा -Cwg 2022 :अचंता शरथ कमलने रचला इतिहास; लियाम पिचफोर्डवर मात करत घेतली 'गोल्डन' भरारी