बर्मिंगहॅम:भारतीय महिला हॉकी संघाला कॉमनवेल्थ गेम्स 2022 ( CWG 2022 ) च्या रोमांचक सेमीफायनलमध्ये ऑस्ट्रेलियाकडून शूटआऊटमध्ये 0-3 असा पराभव पत्करावा लागला. भारतीय महिला हॉकी संघ( Indian womens hockey team ) आता कांस्यपदकासाठी खेळणार आहे. कांस्यपदकाच्या लढतीत भारताचा सामना न्यूझीलंडशी होणार आहे.
दहाव्या मिनिटाला रेबेका ग्रेनरच्या गोलमुळे ऑस्ट्रेलियाने आघाडी घेतली. मात्र त्यानंतर गोलरक्षक कर्णधार सविता पुनियाच्या ( Goalkeeper captain Savita Punia ) नेतृत्वाखाली भारतीय बचावफळीने ऑस्ट्रेलियाला बरोबरीत रोखले. टोकियो ऑलिम्पिकमध्ये चौथ्या स्थानावर असलेल्या भारतीय संघासाठी वंदना कटारियाने 49व्या मिनिटाला सुशीलाजवळ गोल करून बरोबरी साधली.