बर्मिंगहॅम:राष्ट्रकुल क्रीडा 2022 ( CWG 2022 )च्या स्पर्धेत भारताने शानदार कामगिरी केली आहे. भारताने यावेळी एकूण 61 पदके जिंकली. यामध्ये 22 सुवर्ण, 16 रौप्य आणि 23 कांस्य पदकांचा समावेश आहे. त्याचवेळी, बॅडमिंटन महिला एकेरीच्या अंतिम फेरीत पीव्ही सिंधूच्या विजयासह, भारताने सोमवारी राष्ट्रकुल स्पर्धेच्या इतिहासातील 200 वे सुवर्णपदक जिंकले.
बर्मिंगहॅम गेम्समध्ये, भारताने 22 सुवर्णपदके जिंकून एकूण सुवर्णपदकांची संख्या 203 वर पोहोचली ( India's gold medal tally is 203 ). बॅडमिंटन पुरुष एकेरीत सिंधूच्या पाठोपाठ लक्ष्य सेन, पुरुष दुहेरीत सात्विकसाईराज रँकीरेड्डी आणि चिराग सेन या जोडीने सुवर्णपदक जिंकले. त्यानंतर अचंता शरथ कमलने टेबल टेनिसमध्ये सुवर्णपदक जिंकून इतिहास रचला.