बर्मिंगहॅम: भारतीय बॅडमिंटन संघाने उपांत्यपूर्व फेरीत ( Indian Badminton Team Enters Quarter Finals ) आधीच जागा निश्चित केली आहे. त्याचबरोबर आता भारतीय बॅडमिंटन संघाने राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या मिश्र सांघिक स्पर्धेतील अ गटातील अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाचा पराभव करत आपली दमदार कामगिरी कायम ठेवली. गतविजेत्या भारताने शनिवारी पाकिस्तान आणि श्रीलंकेविरुद्ध 5-0 असा शानदार विजय नोंदवत ऑस्ट्रेलियाला 4-1 ने हरवून ( India beat Australia 4-1 ) गटात अव्वल स्थान पटकावले.
वर्ल्ड चॅम्पियनशिपमधील रौप्यपदक विजेत्या किदाम्बी श्रीकांतने ऑस्ट्रेलियाच्या लिन जियांग यिंगवर 21-14, 21-13 असा विजय मिळवत ( Kidambi Srikanth defeats Lin Jiang Ying ) भारताला चांगली सुरुवात करून दिली. दोन वेळा ऑलिम्पिक पदक विजेत्या पी.व्ही. सिंधूने चेन वेंडी हुआन-यूचा 21-10, 21-12 असा पराभव करत भारताची आघाडी 2-0 ने कायम ठेवली. पुरुष दुहेरीच्या लढतीत सुमित आणि चिराग जोडीने ट्रॅन होआंग फाम आणि जॅक य्यू यांचा 21-16, 21-19 असा पराभव करून भारताची आघाडी 3-0 अशी केली.