महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

CWG 2022 : दहाव्या दिवशी बॉक्सिंगमध्ये भारताचे सलग दुसरे पदक; नीतूनंतर अमित पंघलने कोरले सुवर्ण पदकावर नाव

नीतू घनघासनंतर बॉक्सर अमित पंघलने ( Boxer Amit Panghal ) सुवर्णपदक पटकावले आहे. त्याने 51 किलो वजनी गटात इंग्लंडच्या मॅकडोनाल्डचा 5-0 असा पराभव केला.

Boxer Amit Panghal
बॉक्सर अमित पंघल

By

Published : Aug 7, 2022, 4:25 PM IST

Updated : Aug 7, 2022, 4:43 PM IST

बर्मिंगहॅम :कॉमनवेल्थ गेम्स 2022 ( CWG 2022 मध्ये भारतीय वेटलिफ्टर्सनंतर कुस्तीपटूंनी कमाल केली होती. त्यानंतर आता बॉक्सिंगच्या भारतीय खेळाडूंनी पदकांचा पाऊस पाडायला सुरुवात केली आहे. भारतीय महिला बॉक्सर नीतू घनघासने देशासाठी सुवर्णपदक जिंकले आणि काही मिनिटांनंतर, पुरुष बॉक्सर अमित पंघलने सुवर्णपदकाची कमाई ( Boxer Amit Panghal won gold medal ) केली.

बॉक्सर अमित पंघलने 51 किलो वजनी गटात इंग्लंडच्या मॅकडोनाल्डचा 5-0 असा पराभव करून सुवर्णपदक जिंकले ( Amit Panghal won gold medal in Boxing ). त्याच्या अगोदर नीतू घनघासने महिलांच्या 45-48 किलो वजनी गटात सुवर्णपदक पटकावले आहे. तिने अंतिम सामन्यात इंग्लंडच्या डेमी जेडचा 5-0 असा पराभव केला.

भारतीय महिला बॉक्सर नीतू घनघासने ( Boxer Neetu Ghanghas ) राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील महिलांच्या किमान वजन (45-48 किलो) गटात यजमान इंग्लंडच्या रेझ्टन डेमी जेडचा 5-0 असा पराभव करून सुवर्णपदक जिंकले. त्याचवेळी भारताच्या अमित पंघलने पुरुषांच्या 48 किलो-51 किलो (फ्लायवेट) गटात इंग्लंडच्या किरन मॅकडोनाल्डचा 5-0 असा पराभव करून सुवर्णपदकावर नाव कोरले. भारताच्या सुवर्णपदकांची संख्या आता 15 ( India gold medal tally 15 ) झाली आहे.

नीतू आणि अमितसाठी रविवारचा दिवस खास होता. अशा स्थितीत आज संध्याकाळी सात वाजता आणि रात्री एक वाजता आणखी दोन भारतीय बॉक्सरची फायनल होण्याची शक्यता असून, त्यात आणखी दोन सुवर्णपदकांच्या आशा उंचावल्या आहेत. भारतीय वेळेनुसार, सात मोठ्या निखत जरीन ( Boxer Nikhat Zareen ) महिला लाइट फ्लायवेट फायनलमध्ये प्रवेश करतील आणि पुरुषांच्या हेवीवेट अंतिम फेरीत सागर एहलावत रात्री 1 वाजता दिसणार आहेत.

हेही वाचा -Commonwealth Games 2022 : नीतू घनघासने बॉक्सिंगमध्ये जिंकले सुवर्णपदक; स्पर्धेतील भारताचे ठरले 15 वे सुवर्ण

Last Updated : Aug 7, 2022, 4:43 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details