नवी दिल्ली काँग्रेसची सर्वोच्च धोरण ठरवणारी संस्था काँग्रेस कार्यकारिणीची आज बैठक होणार CWC to meet Todayआहे. यामध्ये पक्षाध्यक्ष निवडीशी संबंधित कार्यक्रमाला मंजुरी दिली जाईल. या ऑनलाइन बैठकीत अध्यक्ष निवडीच्या सविस्तर कार्यक्रमाला मंजुरी schedule for election of Congress president देण्याबरोबरच सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त केला जाऊ शकतो, असे सूत्रांचे म्हणणे आहे. गुलाम नबी आझाद यांच्या पक्षातून राजीनामा दिला असल्याने ही बैठक महत्त्वाची मानली जात आहे. अंतर्गत निवडणुकीच्या नावाखाली काँग्रेस नेतृत्व फसवणूक करत असल्याचा आरोप करत आझाद यांनी शुक्रवारी पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा आणि सर्व पदांचा राजीनामा दिला होता. राहुल गांधी यांच्यावर अपरिपक्व आणि बालिश वर्तनाचा आरोपही त्यांनी केला. त्यांनी पक्षाशी गद्दारी केल्याचा आरोप करत काँग्रेसने पलटवार केला CWC MEETING CONGRESS PRESIDENT ELECTION POLL SCHEDULE होता.
सीडब्ल्यूसीच्या या महत्त्वपूर्ण बैठकीपूर्वी, काँग्रेसच्या सूत्रांनी असेही सांगितले की, अध्यक्ष निवडीची प्रक्रिया पूर्ण होण्यास आधीच नियोजित वेळेच्या तुलनेत काही आठवडे उशीर होऊ शकतो. कारण सध्या पक्षाचे लक्ष भारत जोडोवर आहे. गेल्या वर्षी CWC ने मंजूर केलेल्या वेळापत्रकानुसार, काँग्रेस अध्यक्ष निवडीची प्रक्रिया 21 ऑगस्ट ते 20 सप्टेंबर दरम्यान पूर्ण करायची होती.