नवी दिल्ली -काँग्रेस पक्षाध्यक्ष सोनिया गांधी यांच्या अध्यक्षतेखाली सीडब्ल्यूसीची बैठक पार पडली. बैठकीत झालेल्या चर्चेनंतर नेत्यांच्या सूचनांबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना माजी पंतप्रधान मनमोहन सिंग पत्र पाठवणार आहेत. काँग्रेस कार्यकारी समितीने देशभरातील नेते आणि कार्यकर्त्यांना गरजू लोकांची मदत करण्याचे आवाहन केल्याचे काँग्रेसचे सरचिटणीस केसी वेणुगोपाल यांनी सांगितले.
राज्य काँग्रेस समित्यांना राज्य स्तरावर कंट्रोल रूम आणि हेल्पलाईन सुरू करण्यास सांगण्यात आले आहे. जेणेकरुन लोकांना मदत करता येईल. कोरोनाचा पहिला रुग्ण 30 जानेवारी 2020 रोजी उघडकीस आली होता. तर कोरोना लस 16 जानेवारी 2021ला लोकांना टोचवण्यात आली. या दोन तारखांदरम्यान अक्षमता आणि प्रचंड गैरव्यवस्था पाहायला मिळते, असे सीडब्ल्यूसीच्या बैठकीनंतर प्रसिद्ध झालेल्या निवेदनात म्हटले आहे.
पहिल्या दिवसापासूनच केंद्र सरकारने साथीच्या नियंत्रणाशी संबंधित सर्व अधिकार व शक्ती आपल्या हाती घेतल्या. साथीचा रोग अधिनियम आणि आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत, केंद्र सरकारचा प्रत्येक आदेश व निर्देश कायदा बनले. राज्य सरकारांना प्रशासकीय उपाययोजनांचा अवलंब करण्याचा कोणताही अधिकार किंवा स्वातंत्र्य नव्हते, असेही निवेदनात म्हटलं आहे.
सार्वत्रिक लसीकरण करण्यात सरकार अपयशी -