अलीगढCut Private Parts :उत्तर प्रदेशात दिवसेंदिवस गुन्हेगारीचं प्रमाण वाढत चालले आहे. अलीगड जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आलीय. ट्रान्सजेंडरच्या दोन गटात झालेल्या वादात एका तरुणाचा प्रायव्हेट पार्ट कापल्याचा आरोप करण्यात आलाय. शुद्धीवर आल्यानंतर पीडित तरुणानं जावा पोलिस ठाण्यात 6 ट्रान्सजेंडरविरूद्ध गुन्हा दाखल केलाय. पीडित तरुणाच्या तक्रारी आधारे पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.
युवकाचा प्रायव्हेट पार्ट कापला :मिळालेल्या माहितीनुसार, बुलंदशहर येथील एक तरुण 14 वर्षांपासून जिल्ह्यातील एका ट्रान्सजेंडर समूहासोबत नृत्य, गायन करत होता. 25 ऑगस्ट रोजी युवक रामपूरहून बुलंदशहर जिल्ह्यातील त्याच्या गावी जात होता. तो परिसरातील जवां बायपासपर्यंतच पोहोचला होता. त्याच दरम्यान, मागून एका बोलेरो कारमधून किन्नर चव्हाण, अनिता, मुस्कान, शिवम, सिमरन गायत्री आले. सर्व ट्रान्सजेंडरनी त्याला आगोदर बेशुद्ध केलं. त्यानंतर त्यांनी युवकाचा प्रायव्हेट पार्ट कापत घटनास्थळावरुन पळ काढला. 31 ऑगस्टला शुद्धीवर आल्यानंतर तरुणानं सर्व आरोपी ट्रान्सजेंडरविरुद्ध गुन्हा दाखल केलाय.