बेंगळुरू:लोखंडी पेटीत बेकायदेशीरपणे सोने घेऊन जाणाऱ्या एका प्रवाशाला बेंगळुरू विमानतळावर कस्टम अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतले आहे. दुबईहून बेंगळुरू केम्पेगौडा विमानतळावर उतरलेल्या आरोपींकडून 3 किलो सोने जप्त करण्यात आले, अशी माहिती अधिकाऱ्यांनी शुक्रवारी दिली.
Gold Seized : बेंगळुरू आंतरराष्ट्रीय विमानतळावर 3 किलो सोने जप्त - कस्टम अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतले
Gold Seized : पेटीत बेकायदेशीरपणे सोने घेऊन जाणाऱ्या एका प्रवाशाला बेंगळुरू विमानतळावर कस्टम अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतले
22 वर्षीय तरुण 29 नोव्हेंबर रोजी दुबईहून देवनहल्ली केम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळावर आला होता. तरुणावर संशय आल्याने बेंगळुरू कस्टम अधिकाऱ्यांनी त्याची बॅग स्कॅनरद्वारे तपासली असता त्यात संशयास्पद साहित्य आढळून आले. नंतर, अत्याधुनिक स्कॅनरद्वारे तपासले असता, लोखंडी पेटीत ठेवलेले सोने सापडले, असे अधिकाऱ्यांनी शुक्रवारी ट्विट माहिती दिली आहे.
लोखंडी पेटीखाली कापड दाबण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या स्टीलच्या पार्टमध्ये सोने ठेवले होते. सुमारे 1.60 कोटी किमतीचे 3015.13 ग्रॅम सोने जप्त करण्यात आले असून आरोपीला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.