हैदराबाद - हैदराबाद सीमाशुल्क अधिकाऱ्यांनी ( Customs Officials ) दोन महिला व दोन पुरुषांना ताब्यात घेतले आहे. ते मुळचे सुदान येथील असून ते दुबई-हैदराबाद या विमानातून ते सोन्याची तस्करी करत होते. त्यांच्याकडून तब्बल 3 कोटी 60 लाख रुपयांचे सोने जप्त ( Gold Seized ) करण्यात आले आहे.
Gold Seized : शमशाबाद विनातळातून तब्बल 3.6 कोटीचे सोने जप्त, चौघांविरोधात गुन्हा दाखल - 3.6 कोटीचे सोने जप्त,
हैदराबादच्या शमशाबाद विमानतळावरुन ( Shamshabad Airport ) दोन महिला व दोन पुरुषांकडून सीमाशुल्क अधिकाऱ्यांनी ( Customs Officials ) तब्बल 7.3 किलोग्रॅम सोने जप्त ( Gold Seized ) करण्यात आले आहे. याची किंमत 3 कोटी 60 लाख रुपये आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास सुरू आहे.
याबाबत अधिकाऱ्यांनी दिलेली अधिक माहिती अशी की, दोन महिला व दोन पुरुष जे मुळचे सुदान येथील आहेत. ते दुबई-हैदराबाद या विमानाने हैदराबादच्या शमशाबाद विमानतळावर ( Shamshabad Airport ) आले होते. त्यांच्यावर शंका आल्याने त्यांनी झडती घेतली असता 7.3 किलोग्रॅम इते सोने सापडले आहे. हे सोने पेस्ट व बिस्किटाच्या रुपात होते. या प्रकरणी चौघांविरोधात सीमाशुल्क कायदा 1962 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील कारवाई सुरू आहे.
हे ही वाचा -CDS जनरल बिपिन रावत आणि पत्नी मधुलिका यांच्यावर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार, मुलींनी दिला मुखाग्नी