खरगोन ( मध्य प्रदेश ) - राम नवमीच्या निमित्ताने निघालेल्या शोभायात्रेवर काही जणांनी दगडफेक ( Stones Pelted on Procession of Ram Navami ) केली. यामुळे त्या ठिकाणी तणावाचे वातावरण निर्माण झाले. दोन्ही गटातमध्ये तणाव वाढत असल्याने पोलिसांनी सौम्यबलाचा वापर केला. परिस्थिती नियंत्रणात आल्यानंतर शोभायात्रा पुन्हा मार्गस्थ झाली. गृहमंत्री नरोत्तम मिश्रा ( Home Minister Narottam Mishra ) यांनी याबाबत चौकशी करुन दोषींच्या विरोधात कडक कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन दिले आहे. मध्य प्रदेशात कायद्याचे राज्य असून जातीय सलोखा कोणत्याही प्रकारे बिघडवू देणार नाही, असेही मिश्रा म्हणाले. दरम्यान, शहरातील अनेक भागामध्ये संचारबंदी लावण्यात आली ( Curfew was imposed in some parts of Khargone ) आहे.
अश्रूधुराच्या नळकांड्या, पाण्याचा मारा -खरगोन जिल्ह्यात राम नवमीच्या निमित्ताने दरवर्षी शोभा यात्रा काढण्यात येते. या वर्षीही शोभायात्रा काढण्यात आली होती. तालाब चौक मार्गे ही शोभायात्रा गुरुवा दरवाजा येथे जात होती. त्यावेळी अचानक ही घटना घडली. त्यानंतर दोन्ही गटामध्ये मोठ्या प्रमाणात तणाव निर्माण झाला. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या व पाण्याचा माराही केला. त्यानंतर परिस्थीती नियंत्रणात आली.
पोलीस अधीक्षक जखमी -घटनेच्यावेळी पोलिसांचा मुबलक फोजफाटा नव्हता. त्यामुळे परिस्थीती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी कसोशीचे प्रयत्न प्रयत्न करावे लागत होते. दरम्यान, घटनास्थळी फौजफाट्यासह पोलीस अधीक्षक सिद्धार्थ चौधरीही दाखल झाले होते. त्यावेळी काही अज्ञात व्यक्तींनी गोळीबार केला, त्यात पोलीस अधीक्षकांच्या पायाला गोळी लागल्यामुळे ते जखमी झाले आहेत.