नवी दिल्ली Update On Cyclone Tej : अरबी समुद्रात 'तेज' चक्रीवादळ तयार झालं असून पुढील 24 तासांत हे चक्रीवादळ धोक्याचं रुप धारण करु शकतं. तसंच पुढील 24 तासांत त्याचं रुपांतर आणखी खोल दाबात होण्याची शक्यता असल्याचा इशारा हवामान विभागानं दिलाय. हवामान विभागानं या चक्रीवादळाचं वर्णन अतिशय तीव्र चक्रीवादळ असं केलंय. तेज चक्रीवादळ 21 ऑक्टोबर रोजी रात्री 11.30 वाजता तीव्र होईल असं सांगितलं होतं. मात्र आता हे वादळ 22 ऑक्टोबरला दुपारच्या सुमारास अतिशय तीव्र चक्री वादळात रुपांतरित होण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवलाय. तसंच या चक्रीवादळाचा वेग आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे.
येमेन-ओमान किनार्याकडे वाटचाल : भारतीय हवामान विभागानं आपल्या ट्विटर हँडलवर या संदर्भात माहिती दिली आहे. अरबी समुद्रात निर्माण झालेलं हे चक्रीवादळ 25 ऑक्टोबरच्या पहाटे अल घैदा (येमेन) आणि सलालाह (ओमान) दरम्यान ओलांडण्याची शक्यता आहे. याविषयी अधिक माहिती देताना Iहवामान विभागानं म्हटलंय की, शुक्रवारी रात्री 11.30 वाजण्यापूर्वी सोकोत्रा (येमेन) च्या 900 किमी पूर्व-आग्नेय, सलालाह विमानतळाच्या (ओमान) 1,170 किमी आग्नेय आणि अल घायदाह (येमेन) पासून 1,260 किमी पूर्वेस कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला होता. सध्या तेज चक्रीवादळ यमनच्या साकोत्रा किनाऱ्यापासून 550 किलोमीटर पूर्व-दक्षिण पूर्वेकडं आहे. हवामान खात्यानं पुढं म्हटलंय की, WML बंगालच्या उपसागरावर कमी दाबाच्या क्षेत्रात केंद्रित आहे. हे पारादीप (ओडिशा) पासून सुमारे 620 किमी दक्षिणेस, दिघा (पश्चिम बंगाल) च्या 780 किमी दक्षिणेस आहे आणि त्याचा प्रभाव बांगलादेशातील पुपारा येथून 900 किमी SSW वर देखील दिसू शकतो.