नवी दिल्ली: दिल्ली पोलिसांच्या सायबर शाखेने सोमवारी सांगितले की, दिल्लीच्या एका उद्योजकाची 'क्रिप्टोकरेंसी' (CRYPTOCURRENCY STOLEN FROM DELHI BUSINESSMAN ) कथित रुपाने चोरी करुन ती फलस्तिनी संघटना हमासची लष्करी शाखा अल-कासम ब्रिगेडच्या खात्यात हस्तांतरित करण्यात आली.
त्यांनी सांगितले की, उद्योजकाने 2019 मध्ये पश्चिम विहार येथील पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती की, काही अज्ञात लोकांनी त्याची फसवणूक करुव त्याच्या ‘वॉलेट’ मधून 'क्रिप्टोकरेंसी' (CRYPTO CURRENCY ) इतर कोणत्या तरी ठिकाणी पाठवली होती.