महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Cryptocurrency Prices Today : पाहा क्रिप्टोकरन्सी बँकिंग म्हणजे काय ? जाणून घ्या क्रिप्टोकरन्सीचे आजचे दर - क्रिप्टोकरन्सीचे आजचे दर

क्रिप्टोकरन्सीच्या व्यवहारांकडे तरुणाई मोठ्या प्रमाणात आकर्षित झालेली असते. आजचे बीटकॉईनचे दर काय आहेत? जाणून घ्या. क्रिप्टोचलन म्हणजे काय याबद्दल सर्वांना उत्सुकता असते. क्रिप्टोचलन म्हणजे काय हे जाणून घेवू या.

Cryptocurrency Prices Today
क्रिप्टोकरन्सी

By

Published : Jan 16, 2023, 6:41 AM IST

मुंबई : क्रिप्टोकरन्सीला अंतरजालीय चलन असेही म्हणतात. बिटकॉईन हे एक क्रिप्टोकरन्सीचे उत्तम उदाहरण आहे. क्रिप्टो चलनांमध्ये क्रिप्टोग्राफी वापरली जाते. ही एक प्रकारची डिजिटल मालमत्ता आहे. ज्याप्रकारे आपण नोटा आणि नाण्याद्वारे व्यवहार करतो त्याचप्रकारे वस्तू किंवा सेवांच्या खरेदीसाठी क्रिप्टोकरन्सी वापरली जाते. आपण इंटरनेटवरून नियमित चलनांऐवजी वस्तू आणि सेवा खरेदी करण्यासाठी वापरू शकतो.

बीटकॉइन इथेरिअमची किंमत

व्यवहार गोपनीय :आर्थिक व्यवहार सुरक्षित ठेवण्यासाठी, अतिरिक्त समूहांच्या निर्मितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि मालमत्तेचे हस्तांतरण सत्यापित करण्यासाठी सशक्त क्रिप्टोग्राफी वापरते. केंद्रीकृत डिजिटल चलन आणि मध्यवर्ती बँकिंग प्रणालीला विरोध म्हणून क्रिप्टोग्राफी विकेंद्रीकृत नियंत्रणाचा वापर करतात. हे चलन संगणकीय अल्गोरिदमच्या साहाय्याने निर्माण करण्यात आलेले चलन आहे. हे चलन भौतिक नसते. क्रिप्टोकरन्सीद्वारे केलेले व्यवहार गोपनीय असतात त्यावर कोणाचे नियंत्रण नसते. या चलनावर कोणत्याही देशाची किवा कंपनीची मक्तेदारी नाही.

क्रिप्टोकरन्सीचे आजचे दररोलर कोस्टर राइड :2009 मध्ये जेव्हा बिटकॉइन लाँच करण्यात आले तेव्हा त्याची किंमत 0.060 रुपये होती. म्हणजे 10 पैशांपेक्षा कमी आणि आज बिटकॉइनची किंमत 14 लाखांच्या आसपास आहे. एवढेच नाही तर ही क्रिप्टोकरन्सी ५० लाख रुपयांच्या आकड्याला स्पर्श करून परतली आहे. आता तुम्ही स्वतःच कल्पना करू शकता की रोलर कोस्टर राइड बिटकॉइनने या 14 वर्षांमध्ये गुंतवणूकदारांना किती दिला आहे.

काय आहे क्रिप्टो चलन :क्रिप्टो हे ब्लॉकचेन तंत्रज्ञानावर आधारित चलन आहे. ते अस्थिर असल्याने त्याबाबत चिंता व्यक्त केली जाते. त्यामुळे दीर्घकाळासाठी गुंतवणूक करणाऱ्यांसाठी तीव्र जोखीम असते. विशेषत: क्रिप्टो चलनाच्या किमतीमधील प्रचंड चढ-उतारामुळे गुंतवणूकदारांसाठी तीव्र जोखीम असते. इनक्रिप्ट तंत्रज्ञानाच्या डिजीटल एककामधून क्रिप्टोचा व्यापार केला जातो. हे चलन स्वतंत्रपणे मध्यवर्ती बँकेकडून चालविण्यात येते. आज बीटकॉइनची किंमत 16,91,558.15 आसपास आहे. इथेरिअमची किंमत 1,25,630.11 रूपये आहे. बायनान्सची किंमत 21,645 रूपये आहे.

हेही वाचा :Cryptocurrency Prices Today : जाणून घ्या क्रिप्टोकरन्सीचे आजचे दर ; पाहा क्रिप्टोचलन म्हणजे काय ?

ABOUT THE AUTHOR

...view details