मुंबई -बिट कॉइन ( Bit Coin ) आणि इतर क्रिप्टो शेअर्सच्या दरांमध्ये ऐतिहासिक अशी घसरण झाल्यानंतर बिटकॉइन आतापर्यंतच्या सर्वात नीचांकी पातळीवर पोहोचला आहे. तीन आठवड्यापूर्वी बिटकॉइनची किंमत जवळपास 5 लाखांनी घसरली होती. बिटकॉइन या महिन्यातही यामध्ये सातत्याने चढ-उतार पहायला मिळत आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांना मोठा फटका बसला आहे. आज भारतीय बाजारात एका बिटकॉइनची किंमत 19 लाख 64 हजार 704 रुपये ( Todays Bitcoin Rate ) इतकी आहे. कालच्या तुलनेत आज बिटकॉइनचे ( Bit Coin Rate ) कमी झाले आहेत. कालपेक्षा आज हे दर 25,095 रुपयांनी कमी झाले आहेत.
आजचा बिटकॉइन दर -आज बिटकॉइनचा दर भारतीय बाजारात 19 लाख 64 हजार 704 रुपये इतका आहे. कालपेक्षा आज हे दर 25,095 रुपयांनी कमी झाले आहेत. ( Bit Coin Rate )