महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Bitcoin Rate Today : अरे देवा.. बिटकॉइन पुन्हा गडगडला.. तब्बल 'इतक्या' रुपयांनी दर झाले कमी.. - आजच्या क्रिप्टोकरन्सी किमती

गेल्या २४ तासांत बिटकॉइनच्या दरांमध्ये अकरा हजार रुपयांनी घट झाली ( Todays Bitcoin Rate ) आहे. गेल्या दोन महिन्यापासून बिटकॉइनच्या किमतीत घसरण सुरु आहे. त्यामुळे बिटकॉइनच्या गुंतवणूकदारांची चिंता पुन्हा वाढली आहे. बिटकॉइन आतापर्यंतच्या सर्वात नीचांकी पातळीवर पोहोचला आहे. आज भारतीय बाजारात एका बिटकॉइनची किंमत १६ लाख ६९ हजार १४४ रुपये इतकी आहे.

Bitcoin Rate Today
आजच्या क्रिप्टोकरन्सी किमती

By

Published : Jun 26, 2022, 7:31 AM IST

मुंबई :बिटकॉइन ( BTC ) आणि इतर क्रिप्टो शेअर्सच्या दरांमध्ये ऐतिहासिक अशी घसरण झाल्यानंतर बिटकॉइन आतापर्यंतच्या सर्वात नीचांकी पातळीवर पोहोचला आहे. गेल्या आठवड्यात बिटकॉइनची किंमत जवळपास ६ लाखांनी घसरली होती. बिटकॉइन या महिन्यातही पुन्हा एकदा घसरणीच्या मार्गावर ( Todays Bitcoin Rate ) आहे. गुंतवणूकदारांचा प्रतिसाद कमी असल्याने दर सातत्याने उतरत आहेत. त्यामुळे गुंतवणूकदारांना मोठा फटका बसला आहे. आज भारतीय बाजारात एका बिटकॉइनची किंमत १६ लाख ६९ हजार १४४ रुपये इतकी आहे.

आजचा बिटकॉइनचा दर

आज बिटकॉइनचा दर आंतरराष्ट्रीय बाजारात २१ हजार ३३० डॉलर इतका आहे. तर हाच दर भारतीय बाजारात १६ लाख ६९ हजार १४४ रुपये इतका आहे.

आजचा इथेरिअम कॉईनचा दर

आज इथेरिअम कॉइनचा दर आंतरराष्ट्रीय बाजारात १ हजार १९६ डॉलर इतका आहे. तर हाच दर भारतीय बाजारात १ लाख ३५ हजार ६८२ रुपये इतका आहे.

आजचा डोज कॉईनचा दर

आज डोज कॉइनचा दर आंतरराष्ट्रीय बाजारात ०.०६९ डॉलर इतका आहे. तर हाच दर भारतीय बाजारात ५.३० रुपये इतका आहे.

हेही वाचा :सोन्याचे भाव वाढले तर, चांदीच्या भावामध्ये घट.. पहा आजचे देशभरातील दर

For All Latest Updates

ABOUT THE AUTHOR

...view details