मुंबई -क्रिप्टो करन्सीच्या व्यवहारांकडे तरुणांचे मोठ्या प्रमाणात लक्ष Cryptocurrency Prices Today असते. विदेशाप्रमाणाचे भारतीय तरुणांमध्येही क्रिप्टोकरन्सीच्या व्यवहाराचे आकर्षण आहे. आज बीटकॉईनचे दर Todays Bitcoin Rate उतरले आहेत. जाणून घ्या आजचे बीटकॉईनचे दर काय आहेत. Cryptocurrency Prices Today In India 2 September 2022
बिटकॉइनमध्ये घसरण -जागतिक क्रिप्टो चलन बाजारात अस्थिरता दिसून आली. जगातील सर्वात मोठी आणि लोकप्रिय क्रिप्टोकरन्सी बिटकॉइनमध्ये Bitcoin गुरुवारी 1% ची घसरण झाली. दुसरीकडे, पॉलीगॉन Polygon आणि लिटकॉइन Litecoin च्या किमतीत किंचित वाढ झाली. गुरुवारी 1% च्या घसरणीसह बिटकॉइन 20,073$ वर व्यापार करत आहे. CoinGecko च्या मते, गेल्या 24 तासांत जागतिक क्रिप्टोमध्ये घसरण झाली असून 1.02$ ट्रिलियनवर व्यापार करत आहे, 2% खाली.
डिजिटल चलनांच्या किमतीत वाढ -जगातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी आणि लोकप्रिय क्रिप्टोकरन्सी असलेल्या इथरियम ब्लॉकचेनच्या इथरच्या किमतीही घसरल्या. इथर 3% घसरून 1,555$ वर व्यापार करत आहे. Dogecoin ची किंमत देखील 0.06$ वर 3 टक्क्यांनी घसरत आहे. शिबा इनू 0.0000012$ वर 2 टक्क्यांनी घसरला आहे. गेल्या 24 तासात जिथे चेनलिंक, एपिकॉन, सोलोना, पोल्काडॉट, टिथरमध्ये घट झाली आहे. दुसरीकडे, Litecoin, Polygon आणि Stellar सारख्या डिजिटल चलनांच्या किमतीत वाढ झाली आहे.
काय म्हणतात तज्ञ -जागतिक क्रिप्टो इन्व्हेस्टमेंट प्लॅटफॉर्म Mudrex चे CEO आणि सह-संस्थापक इदुल पटेल म्हणतात की बिटकॉइनची किंमत जर आज 20,200$ वर घसरली आहे, तर येत्या काळात बिटकॉइन 20,000$ च्या खाली जाण्याची शक्याता आहे. त्याच वेळी, इथर देखील सध्या 1,500$ वर व्यापार करत आहे, परंतु लवकरच इथर 2,000$ च्या किमतीत वाढ होण्याची शक्यता आहे. दुसरीकडे, फेडरल रिझर्व्हने व्याजदरात केलेली वाढ आणि वाढत्या महागाईमुळे या वर्षाच्या पहिल्या सहामाहीपासून क्रिप्टोकरन्सीच्या बाजारभावात घसरण झाली आहे.
हेही वाचा -Petrol Diesel Rate Today : राज्यात कुठे पेट्रोल-डिझेलचे दर स्वस्त आणि महाग, जाणून घ्या आजचे दर