केंद्रीय राखीव पोलिस दल (CRPF) (CRPF Recruitment 2023) ने सहाय्यक उपनिरीक्षक ASI (स्टेनो) आणि हेड कॉन्स्टेबलच्या पदांची भरती (Vacancy For Head Constable in CRPF And ASI) सुरु केली आहे. या रिक्त पदांद्वारे एकूण 1458 पदांची भरती होणार आहे. यामध्ये सहाय्यक उपनिरीक्षक स्टेनोच्या 143 आणि हेड कॉन्स्टेबलच्या 1315 जागांसाठी नियुक्त्या करण्यात येणार आहेत. आता अशा परिस्थितीत, या पदांसाठी अर्ज करू इच्छिणारे सर्व उमेदवार CRPF crpf.gov.in आणि crpf.nic.in या अधिकृत वेबसाइटद्वारे अर्ज करू शकतात. या पदांसाठी आजपासून (Application process starts from today) अर्ज प्रक्रिया सुरू होत आहे. त्याच वेळी, या पदांसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 25 जानेवारी 2023 आहे. शेवटच्या तारखेनंतर कोणतेही अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. त्यामुळे उमेदवारांनी हे लक्षात ठेवावे.
या तारखा लक्षात ठेवा :ऑनलाइन अर्ज सुरू करण्याची तारीख: जानेवारी 04, 2023, तर ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 25 जानेवारी 2023, तर परीक्षेसाठी प्रवेशपत्र जारी करण्याची तारीख: 15 फेब्रुवारी 2023 ही आहे.