नवी दिल्ली - सीआरपीएफच्या हेड कॉन्स्टेबलने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. ही घटना पूर्व दिल्लीमध्ये मयूर विहार फेज 3 परिसरात स्मति वन पार्कमध्ये घडली आहे.
पोलिसांना माहिती मिळताच गाजीपूर ठाण्याचे पोलीस घटनास्थळी पोहोचले. त्यांनी जवानाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविला आहे. या प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे. पोलिसांनी सीआरपीएफ आणि मृताच्या नातेवाईकांना घटनेची माहिती दिली आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार शनिवारी सकाळी गाजीपूर ठाण्यांतर्गत स्मृतीवन येथे झाडाला मृतदेह लटकल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पोलीस हे घटनास्थळी पोहोचले. त्याठिकाणी बॅग आढळून आली. त्यामधील कागदपत्रानुसार मृतदेह हा 52 वर्षीय शाजी यांचा असल्याची माहिती समोर आली.