उज्जैन -सध्या महाराष्ट्रात श्रावण महिना नुकताच सुरू झाला ( Shravan month )आहे. त्यातही आज श्रावणातला दुसरा सोमवार आहे. मात्र मध्य प्रदेशच्या उज्जैनमध्ये महाकालेश्वर मंदिरात श्रावण महिन्याचा शेवटचा सोमवार आज भाविक साजरा करत आहेत ( Ujjain Mahakaleshwar Temple ). भाविकांकडून भगवान महाकाल ( Lord Mahakal ) यांना विधिवत पंचामृत अभिषेक करण्यात येत आहे. यावेळी पुजारी यांनी बाबांना जल अर्पण केले आहे. त्यानंतर दूध, तूप, दही, साखर, मध यांचा अभिषेक करण्यात आला. मोठ्या संख्येने भाविकांनी बाबा महाकालाचे दर्शन घेतले. अभिषेकानंतर बाबांची आरती करण्यात आली. बाबांचा श्रृंगार करण्यात आला. आज सायंकाळी 4 वाजता बाबा महाकाल यांची पालखीतून मिरवणूक काढली जाणार आहेत. मंदिरात भाविक मोठी गर्दी करत आहेत ( Crowd of devotees in Mahakal Temple ).
राजाचा श्रृंगार करण्यात आला -उज्जैनमध्ये श्रावण महिन्याचा शेवटचा सोमवार भाविक साजरा करत आहेत. बाबा महाकाल यांचा आज भांग आणि अबीर, चंदनाचा लेप लावून श्रृंगार करण्यात आला. बाबा महाकाल यांना आज राजाची वेशभूषा करण्यात आली होती. चांदीच्या अलंकारांनी भगवान बाबा महाकाल तयार करण्यात आले. बाबा महाकाल चांदीचा त्रिपुंड, चांदीचा चंद्र, चांदीचे त्रिनेत्र आणि कानात नाग अशा साधनांनी सजवले गेले. मंदिर फुलांनी सजवण्यात आले होते. याशिवाय चांदीचे छत्र, रुद्राक्षाची जपमाळ, फुलांच्या माळा आणि रंगीबेरंगी वस्त्रे देवाला अर्पण करून सर्व प्रकारची फळे, मिठाई नैवेद्य म्हणून देण्यात आली.
पहाटे अडीच वाजता मंदिराचे दरवाजे उघडले -श्रावण महिन्यात उज्जैन महाकाल मंदिराचे पुजारी पहाटे अडीच वाजता बाबा महाकाल मंदिराचे दरवाजे उघडतात आणि भस्म आरतीची तयारी करतात. आज या वेळी पुरोहितांनी मिळून सुमारे 1 तास बाबांची भस्म आरती करून बाबांची पूजा केली. या दुर्मिळ भस्म आरतीच्या दर्शनाचा लाभ भाविकांना मिळत आहे. सामान्य दिवसांच्या तुलनेत श्रावण महिन्यात पर्यटकांची संख्या दुपटीने वाढते.