हैदराबाद -सरकारने राज्यात कोविड नियमांची अंमलबजावणीत वाढ केली आहे. या महिन्याच्या 10 तारखेपर्यंत घरे, सभा, रॅली, राजकीय, सांस्कृतिक आणि धार्मिक उपक्रमांवर बंदी (Crowd gatherings banned in telangana) घालण्यात आली आहे. या महिन्याच्या 10 तारखेपर्यंत सर्व मेळाव्यावर निर्बंध लादले आहेत. तसेच मास्क न घालणाऱ्यांना 1000 रुपयांचा दंडही आकारण्यात आला आहे.
कोविड निर्बंधांवर उच्चस्तरीय आढावा:
जगभरातील विविध देशांमध्ये आणि आपल्या देशातील इतर राज्यांमध्ये कोविड प्रकरणांची वाढती संख्या लक्षात घेऊन राज्य सरकारने अधिक सतर्क राहण्याचा आणि योग्य खबरदारी घेण्याचे ठरवले आहे. देशातील विविध राज्यांमध्ये ओमायक्रॉनचे रुग्ण वेगाने पसरत असताना सीएस सोमेश कुमार यांनी राज्यातील कोविड परिस्थितीचा उच्चस्तरीय आढावा घेतला आहे. या बैठकीला डीजीपी महेंद्र रेड्डी यांच्यासह वैद्यकीय, आरोग्य आणि पंचायत राज विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. कोणत्याही परिस्थितीत मोठ्या गर्दीला परवानगी नसल्याचे स्पष्ट केले.