चंदीगड -सीमेपलीकडून (पाकिस्तानमधून) ड्रोनच्या हल्ल्यांचा धोका वाढला आहे. आयएसआय ग्रुपकडून समर्थन असलेले दहशतवादी, खलिस्तानी ग्रुप हे शेतकरी नेत्यांना लक्ष्य करू शकतात, अशी भीती पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना लिहिलेल्या पत्रात व्यक्त केली आहे. पंतप्रधान मोदी यांनी आंदोलक शेतकऱ्यांबरोबर संवादाला सुरुवात करावी व प्रश्नांवर तोडगा काढण्यासाठी लक्ष केंद्रित करावे, अशी अपेक्षा मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांनी केली आहे.
पंजाबमधील सर्वपक्षीय प्रतिनिधी हे पंतप्रधानांशी चर्चा करून आंदोलक शेतकऱ्यांचा प्रश्न सोडविण्यासाठी मार्ग काढण्याकरिता तयार असल्याचे पंजाबच्या मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे. दीर्घकाळ चाललेल्या शेतकरी आंदोलनाने सामाजिक एकता आणि आर्थिक स्थितीला धोका उत्पन्न होत आहे. सीमेपलीकडून दहशतवादी हे शेतकऱयांच्या भावनांचा फायदा घेऊ शकतात. पंजाबला मोठी आंतरराष्ट्रीय सीमा आहे, याकडेही पंजाबच्या मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांचे लक्ष वेधले.
हेही वाचा-संभाव्य तिसऱ्या लाटेसाठी उद्योग क्षेत्राचे नियोजन करा; मुख्यमंत्र्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांना सूचना