मुंबई -27 फेब्रुवारी हा कवी कुसुमाग्रजांचा जन्म दिवस मराठी भाषा दिवस म्हणून साजरा केला जातो. हल्ली भाषेचेही दिवस साजरे केले जातात. कारण जगभरातच मातृभाषा आणि बोलीभाषांचे मर्तिक घातले जात आहे. 21 फेब्रुवारीला आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिवस साजरा केला गेला. आज मराठी भाषा दिवस साजरा होत आहे. (Criticized In Rokhathok articale On BJP) अनेक भाषा, विविध संस्कृती हे आपल्या देशाचे वैभव आहे, पण महाराष्ट्रात मराठी भाषेची नेमकी अवस्था काय आहे? राज्यभरात मराठी बोलली जाते म्हणून मराठी वैभवाच्या शिखरावर आहे असे नाही. ( Kusumagraj ) ज्या कुसुमाग्रजांच्या जन्मदिनी मराठी भाषा दिवस साजरा होतो त्याच कुसुमाग्रजांनी अत्यंत व्यथित अंतःकरणाने सांगितले होते, ''मंत्रालयाच्या पायरीवर मराठी भिकारणीसारखी उभी आहे!'' या परिस्थितीत बदल होणार नसेल तर मराठी भाषा दिवसाचे माहात्म्य ते काय? अशी खंत आजच्या रोखठोक या सदरातून व्यक्त केली आहे.
मराठी भाषेचा अभिमान बाळगणे हे त्यांच्या विचार चौकटीत बसत नाही
दरम्यान, महाराष्ट्रातील शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे पक्ष मराठीधार्जिणे आहेत. भारतीय जनता पक्षाचे तसे नाही. त्यांचा विचार राष्ट्रव्यापी आणि व्यापारी प्रवृत्तीचा आहे. बेळगावात मराठी माणसांवर अत्याचार होताच शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेस तीक्र प्रतिक्रिया व्यक्त करतील. पण भाजपचे नेते मूग गिळून गप्प बसतील. (Marathi Language Pride Day) हा त्यांचा वैचारिक गोंधळ आहे. मराठी भाषेचा अभिमान बाळगणे हे त्यांच्या विचार चौकटीत बसत नाही असा थेट घाणाघात या रोखठोकमधून करण्यात आला आहे.
मराठी माणसावर दिल्लीची आक्रमणे मोगलांच्या पद्धतीने सुरू आहेत
एकदा मराठी भाषा अन्याय निर्मूलन परिषद मुंबईत भरली व त्यास पु. भा. भावे यांच्यासारख्या थोरांनी तेव्हा मार्गदर्शन केले. मराठी भाषेच्या संरक्षणाचा प्रश्न आज मुंबईपासून नागपूर, मराठवाड्यापर्यंत सर्वत्रच उभा आहे. बाळासाहेब ठाकरे, लता मंगेशकर आपल्यातून गेल्या. मात्र त्यांनी आपले सर्वस्व मराठीसाठीच वेचले. बाबासाहेब पुरंदरेदेखील आज आपल्यात नाहीत, पण त्यांनीही मराठीचे वैभव पुढे नेले. आज महाराष्ट्रावर व मराठी माणसावर दिल्लीची आक्रमणे मोगलांच्या पद्धतीने सुरू आहेत. मराठी माणूस व्यापारी वृत्तीचा व कपटी मनोवृत्तीचा नाही, मराठी माणूस हा जगाच्या स्पर्धेत पुरेपूर उतरणारा आहे, तो सामान्य नाही हा आत्मविश्वास नव्या पिढीत निर्माण करणे आणि सर्व क्षेत्रांत पुढे येण्यासाठी त्यांना बळ देणे आवश्यक आहे अशी अपेक्षाही यामधून व्यक्त करण्यात आली आहे.
मंत्री यावर आश्वासनांची पाने पुसून गप्प बसले
महाराष्ट्रात मराठी भाषेच्या विकासासाठी स्वतंत्र मंत्रालय आहे व सुभाष देसाई त्या खात्याचे मंत्री आहेत. श्री. देसाई एका शिष्टमंडळासह केंद्रीय मंत्री किशन रेड्डी यांना भेटले. मराठीस अभिजात भाषेचा दर्जा देण्याची मागणी केली. मंत्री यावर आश्वासनांची पाने पुसून गप्प बसले. कुसुमाग्रजांना मराठी भाषेचा ज्वलंत अभिमान. मराठी भाषेला वैभव प्राप्त व्हावे म्हणून त्यांनी आयुष्यभर कष्ट केले. मराठी माणसाला त्यांचे न्याय्य हक्क मिळतील तेव्हा मराठी भाषेसाठी झगडा करण्याची वेळ येणार नाही, असे कुसुमाग्रज म्हणत.