बिजनौर UP Crime News : पेंट आणि हार्डवेअर व्यावसायिकाच्या घरात पाच चोरट्यांनी घुसून गोंधळ घातला. व्यावसायिकाची पत्नी घरात एकटी असल्याचं पाहून चोरट्यांनी तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. तसंच जळत्या सिगारेटनं तिचा हात जाळला. महिला बेशुद्ध झाल्यावर तिला खोलीत बंद करण्यात आलं. यानंतर चोरट्यांनी घरातून रोख रक्कम आणि दागिने घेऊन पलायन केलं. दरम्यान, बिजनौरमध्ये झालेल्या सामूहिक बलात्काराच्या घटनेनंतर पोलीस विभागात एकच खळबळ उडाली आहे.
पोलिसांत तक्रार दाखल :नगीना देहाट पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावात राहणाऱ्या एका व्यावसायिकानं बुधवारी पोलिसांत तक्रार दाखल केली. त्यात ते म्हणालेत की, मंगळवारी सायंकाळी आपले मुलं अन् आईसह ते धामापूर येथे औषध घेण्यासाठी गेले होते. त्यावेळी त्यांची पत्नी घरात एकटीच होती. संध्याकाळी 7.30 वाजेच्या दरम्यान 5 सशस्त्र गुंडांनी शेजारच्या घराच्या छतावरून घरात प्रवेश केला. त्यानंतर त्यांनी पीडितेला बेदम मारहाण केली. तिचा हात सिगारेटनं जाळला अन् या पाच नराधमांनी त्यांच्या पत्नीवर सामूहिक बलात्कार केला.
स्कूटर आणि एलईडी टीव्हीही नेली सोबत :यावेळी चोरट्यांनी कटरच्या साहाय्यानं घरातील कपाटांचे कुलूप तोडले. 25 तोळे सोन्याचे दागिने, दोन किलो चांदी अन् 1.5 लाख रुपये रोख घेऊन ते फरार झाले. तेथून निघताना त्यांनी स्कूटर आणि एलईडी टीव्हीही सोबत नेला. बुधवारी सकाळी व्यावसायिकाच्या घरात कोणतीही हालचाल दिसली नाही, तेव्हा लोकांनी त्यांना माहिती दिली. व्यावसायिकाच्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी दरोडा आणि सामूहिक बलात्काराच्या कलमांतर्गत एफआयआर दाखल केला आहे.
पोलिसांची तीन पथकं तयार :बिजनौरचे एसपी नीरज कुमार जादौन यांनी सांगितलं की, महिलेच्या हातावर सिगारेटनं जाळल्याच्या दोन खुणा आढळल्या आहेत. दरोडा आणि सामूहिक बलात्काराच्या कलमांतर्गत एफआयआर दाखल करण्यात आलाय. पोलिसांना वेळेबाबत शंका असून व्यापारी धामापूरला जात असल्याची माहिती चोरट्यांना कशी लागली? या घटनेत ओळखीच्या व्यक्तीचा हात असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली. दरम्यान, या प्रकरणाचा सर्व बाजूंनी तपास सुरू असून पोलिसांची तीन पथकं चोरट्यांना पकडण्याकरिता रवाना झाले आहेत.
हेही वाचा -
- Six People Murdered in Deoria : उत्तर प्रदेश हादरलं! जुन्या वादातून माजी जिल्हा परिषद सदस्यासह 6 जणांची हत्या
- Crime News : अमानुषतेचा कळस! मुलांना लघुशंका प्यायला लावत प्रायव्हेट पार्टवर मिरची लावली, Watch Video
- Aligarh Love Story : प्रेमापोटी तरुणानं केलं धर्मांतर.. प्रेयसीनं केला विश्वासघात अन्...