महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Dead Body Cut Into Pieces : भीषण! अनैतिक संबंधाच्या संशयातून खून.. तुकडे करून जाळला मृतदेह! - हत्येनंतर मृतदेहाचे तुकडे केले

आंध्र प्रदेशात खुनाची एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. येथे अनैतिक संबंधाच्या संशयातून एकाची निर्घृणपणे हत्या करण्यात आली. हत्येनंतर मृतदेहाचे तुकडे करून ते शेतात जाळण्यात आले. पोलिसांनी याप्रकरणी तिघांना अटक केली आहे.

Body Cut Into Pieces
तुकडे करून जाळला मृतदेह

By

Published : Feb 26, 2023, 10:14 AM IST

पालनाडू (आंध्र प्रदेश) : आंध्र प्रदेशच्या पालनाडू जिल्ह्यातील गुराळा मतदारसंघातील दाचेपल्ली येथे एकाची निर्घृणपणे हत्या करण्यात आली. हत्येनंतर मृतदेहाचे 16 तुकडे करण्यात आले. शुक्रवारी मध्यरात्री दाचेपल्ली बायपासजवळ घडलेल्या या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.

डोक्यात लोखंडी रॉडने वार केले : पोलिसांनी आणि पीडितेच्या कुटुंबियांनी दिलेल्या माहितीनुसार, बोम्बोथुला सैदुलु आणि जी. कोटेश्वर राव (४५) धाचेपल्ली हे पंचायतीमध्ये आउटसोर्स प्लंबर म्हणून काम करतात. शुक्रवारी रात्री ८ वाजता कोटेश्वर राव हे बायपास परिसरातील पाण्याच्या टाकीवर इलेक्ट्रिक मोटार बंद करण्यासाठी गेले होते. सैदुलु त्याच्या मुलासह आधीच तेथे टपून बसला होता. दोघांनीही कोटेश्वर राव यांच्या डोक्यात लोखंडी रॉडने वार केला. या हल्यात त्याचा जागीच मृत्यू झाला.

मृतदेहाचे 16 तुकडे केले :हत्येनंतर दोघांनी मिळून मृतदेह एका पोत्यात टाकून एपी मॉडेल शाळेजवळील त्यांच्या शेतात नेला. त्यांनी तो मृतदेह मिरचीच्या पिकात ठेवून त्याचे कुऱ्हाडीने 16 तुकडे केले. त्यानंतर त्यांनी मृतदेहाभोवती काड्यांचा ढीग गोळा करून पेट्रोल टाकून मृतदेहाला पेटवून दिले. रात्री दहा वाजून गेले तरीही कोटेश्वर घरी न आल्याने कुटुंबीय व नातेवाईकांनी चौकशी केली. त्यांनी बाहेर जाऊन शोध सुरू केला.

आरोपी पळण्याच्या तयारीत होते : शेतात मृतदेह जाळल्याने तेथे आग लागली होती. आग लागल्याचे पाहून ते शोध घेण्यासाठी तेथे गेले. कसून पाहणी केल्यानंतर त्यांना तेथे जळत असलेला पाय दिसला. कुटुंबियांनी लगेच घटनेची माहिती पोलिसांना दिली. त्यानंतर सर्व नातेवाईक आरोपीच्या घरी गेले. दोन्ही आरोपी सामान गोळा करून पळून जाण्याच्या तयारीत होते. कोटेश्वरच्या कुटुंबियांनी कोटेश्वर सोबत काय केले असे विचारले असता त्यांनी उत्तर दिले नाही. मात्र त्यांना हत्येनंतर घरी आलेल्या पिता-पुत्राचे कपडे जाळताना सैदुलूची पत्नी कोटम्मा दिसली.

आरोपींना अटक : त्यानंतर पोलिसांनी तेथे येऊन तिघांनाही अटक केली. पोलिसांनी घटनास्थळाची देखील पाहणी केली. शनिवारी सकाळी गुराळा शासकीय रुग्णालयातून डॉक्टरांना बोलावून घटनास्थळी मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले. दुपारी पीडित कुटुंबीय आणि नातेवाईकांनी रस्त्यावर ठिय्या मांडला. त्यांनी पीडित कुटुंबाला न्याय देण्याची मागणी केली. सीआयने ही मागणी मान्य करून न्याय मिळवून देण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.

विवाहबाह्य संबंध असल्याची शंका : घटनाक्रमानुसार पोलिसांचा असा संशय आहे की, कोटेश्वर राव यांची हत्या योजनेनुसार झाली आहे. मुख्य आरोपी सैदुलूवर यापूर्वीही अनेक गुन्हे दाखल असल्याचे पोलिसांनी उघड केले आहे. या हत्येला तेच जबाबदार असल्याचे त्यांचे मत आहे. विवाहबाह्य संबंधांचाही विचार केला जात आहे. मृताला पत्नी व तीन मुले आहेत. सीआय शेख बिलालुद्दीन यांनी सांगितले की, तिन्ही आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा :Bihar Rape : गयामध्ये 10 वर्षांच्या मुलीवर बलात्कार, 12 ते 13 वर्षे वयोगटातील तीन अल्पवयीन आरोपी

ABOUT THE AUTHOR

...view details