नवी दिल्ली -राजधानीत गुन्ह्यांच्या घटनांमध्ये प्रचंड वाढ झाली आहे. देशात भाजपची सत्ता आल्यापासून राजधानी दिल्लीत गुन्ह्यांमध्ये ३०० ते ४०० टक्क्यांनी वाढ झाल्याचे एनसीआरबीच्या अहवालात नमुद करण्यात आले आहे.
मागील वर्षांच्या तुलनेत हिंसक गुन्ह्यांमध्ये २०११-१२ मध्ये किरकोळ घट झाली होती. परंतु निर्भया बलात्काराच्या घटनेनंतर वाढत्या गुन्हेगारीचे प्रमाण दिल्ली पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्न उपस्थित करत आहे. बलात्कार आणि हत्येसारख्या भयंकर गुन्ह्यांच्या घटनांमध्ये दिल्लीत मोठी वाढ झाली आहे.
महिला विरोधी गुन्हेगारीत दिल्लीचा पहिला नंबर
महिलांविरोधातील गुन्ह्यांमध्ये देशातील १९ मोठ्या शहरांमध्ये दिल्ली पहिल्या स्थानावर आहे. भाजप सरकारच्या पहिल्या टर्ममध्ये म्हणजेच २०१४ ते २०१९ या कालावधील दिल्लीत चोरी, दुचाकी चोरीच्या २ हजार पेक्षा जास्त घटनांची नोंद झाली. त्याचप्रमाणे बलात्कार आणि महिलांवरील लैंगिक गुन्ह्यांमध्ये 440 टक्क्यांनी वाढ झाली आहे. इतर राज्यांतील पोलीस राज्य सरकारच्या अखत्यारीत येतात, परंतु दिल्ली पोलीस थेट गृह मंत्रालयाच्या अखत्यारीत आहेत.