रुड़की ( उत्तराखंड ) :डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, ऋषभ पंतच्या कपाळाला आणि पायाला दुखापत झाली आहे. माहिती मिळताच देहात पोलीस अधीक्षक स्वप्ना किशोर सिंह ( Superintendent of Police Swapna Kishore Singh ) घटनास्थळी पोहोचल्या. सक्षम हॉस्पिटलचे अध्यक्ष डॉ. सुशील नागर यांनी सांगितले की, सध्या ऋषभ पंतची प्रकृती स्थिर आहे, त्यांना रुरकीहून दिल्लीला पाठवण्यात येत आहे. तिथे त्याची प्लास्टिक सर्जरी ( Rishabh Pants plastic surgery ) केली जाणार आहे.
कार रेलिंगला आदळल्याने झाला अपघात : ऋषभची कार रेलिंगला धडकली, त्यानंतर कारने पेट घेतला. मोठ्या कष्टाने आग आटोक्यात आणण्यात आली. त्याचवेळी अपघातात गंभीर जखमी झालेल्या ऋषभ पंतला दिल्ली रोडवर असलेल्या सक्षम रुग्णालयात दाखल ( Sakham Hospital Delhi ) करण्यात आले.