कानपूर Kanpur News :कानपूरमध्ये रेल्वे स्थानकावर एक धक्कादायक घटना घडली आहे. सचेंडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कानपूर- झाशी रेल्वे मार्गावर बसून दोन तरुण विश्वचषक क्रिकेट सामना बघत होते. दोघांनीपण कानात इअरफोन घातल्यामुळं त्यांना रेल्वेचा आवाज ऐकू आला नाही. रेल्वेची धडक बसल्यानं दोघांचाही जागीच मृत्यू झाला. दिवाळीच्या तोंडावर हा अपघात घडल्यानं मृतांच्या कुटुंबीयावर दुःखाचा डोंगर कोसळलाय.
Kanpur News : अफगाणिस्तान-दक्षिण आफ्रिकेचा सामना पाहताना एक चूक भोवल्यानं दोघांचा मृत्यू, नेमकी घडली कशी घटना? - कानपूर न्यूज
Kanpur News : कानपूरमध्ये रेल्वे रुळावर बसून क्रिकेट मॅच पाहणे दोन तरुणांसाठी महागात पडलंय. दोघांना भरधाव वेगात आलेल्या ट्रेननं धडक दिली. यामुळं त्यांचा जागीच मृत्यू झालाय.
![Kanpur News : अफगाणिस्तान-दक्षिण आफ्रिकेचा सामना पाहताना एक चूक भोवल्यानं दोघांचा मृत्यू, नेमकी घडली कशी घटना? Two people died while watching a cricket match sitting on the railway tracks](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/12-11-2023/1200-675-20006192-thumbnail-16x9-kanpur-news.jpg)
Published : Nov 12, 2023, 1:41 PM IST
इअरफोन्समुळे हॉर्नचा आवाज ऐकू येत नव्हता :या घटनेप्रकरणी अधिक माहिती देत एसीपी तेज बहादूर सिंह यांनी सांगितले की, शनिवारी सचेंडी भागातील रहिवासी 18 वर्षीय आशिष कुमार आणि 20 वर्षीय सुभाष कुमार मोबाईलवर दक्षिण आफ्रिका आणि अफगाणिस्तान यांच्यातील क्रिकेट सामना पाहत होते. यावेळी दोघांनीही कानात इअरफोन घातले होते. ते अगोदर बराच वेळ कानपूर-झाशी रेल्वे ट्रॅकजवळ बसून होते. त्यानंतर सायंकाळी ते रेल्वे रुळावर जाऊन बसले. दोघांनीही कानात इअरफोन घातल्यामुळं त्यांना ट्रेनचा हॉर्न ऐकू आला नाही. त्यामुळं रेल्वेची धडक बसल्यानं त्यांचा जागीच मृत्यू झाला.
- दिवाळीपूर्वी दोन कुटुंबात शोककळा : अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी दोघांच्या मृतदेहाची ओळख पटवून त्यांच्या कुटुंबीयांना घटनेसंदर्भात माहिती दिली. त्यामुळं मृतांच्या कुटुंबात शोककळा पसरली आहे. आशिषचे वडील बिंदा प्रसाद एका खाजगी कंपनीत काम करतात, तर सुभाषचे वडील शेतकरी आहेत.
- दोन्ही तरुण सैन्यात भरती होण्याच्या तयारीत होते : आशिष आणि सुभाष सैन्यात भरती होण्याची तयारी करत असल्याची माहिती त्यांच्या कुटुंबीयांनी दिली. या दोघांनीही सैन्यात जाऊन देशसेवा करण्याचा निर्धार केला होता. पण कदाचित नशिबात काहीतरी वेगळंच होतं.
हेही वाचा -
- Kanpur Mahindra Car Accident Case: कारची एअरबॅग न उघडल्यानं मुलाचा मृत्यू, आनंद महिंद्रासह १३ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
- Massive Fire in Kanpur : कानपूरमध्ये 500 हून अधिक दुकानांना आग, कोट्यवधींचा माल जळून खाक
- Soldier Skull : 166 वर्षांनंतर 'या' क्रांतिकारकाची कवटी मायदेशी परतली, जाणून घ्या कसा लागला शोध..