हैदराबाद - तेलंगाणा आणि आंध्र प्रदेशातील वीटभट्टीवर काम करण्यासाठी महाराष्ट्रातील हजारो मजूर स्थलांतरीत ( migrant brick worker ) झाले आहेत. वीटभट्टीवर मजुरांसह त्यांचे चिमुकले मुलंही ( brick worker children ) काम करत असल्याचं विदारक चित्र दिसत आहे. तेलंगाणात या चिमुकल्यांना मराठी शिक्षणाची ( marathi education ) कोणतीही व्यवस्था नसल्यानं वीटभट्टीवरील मजुरांच्या मुलांसाठी पोलीस आयुक्त महेश भागवत ( cp mahesh bhagwat ) यांनी पुढाकार घेतला होता. त्या माध्यमातून त्यांनी सामाजिक संस्थेच्या मदतीनं या चिमुकल्यांना मराठीतून शिक्षण देणारी वस्तीशाळा ( Worksite School ) सुरू केली आहे. त्या शाळेतील चिमुकल्यांचं आता सरकारी शाळेत पुनर्वसन करण्यात आलं आहे.
वीटभट्टीवरील मजुरांच्या मुलांच्या शिक्षणात अशी होती भाषीक अडचण -महाराष्ट्रालगतच्या प्रदेशातून अनेक मजूर ( brick worker ) तेलंगाणामधील वीटभट्टीवर काम करण्यासाठी स्थलांतरीत ( migrant brick worker ) झालेले आहेत. यातील काही मजूर हे तिमायपल्ली येथील बशीर शेख यांच्या वीटभट्टीवर काम करतात. या मजुरांची 30 मुलं ( brick worker children ) या मजुरांच्यासोबत राहत होती. मात्र मराठी भाषीक मुलांच्या शिक्षणाची व्यवस्था तेलंगाणात नाही. तेलंगाणातील सरकारी शाळेत तेलुगु भाषा शिकवली जाते. मजुरांच्या मुलांना ( brick worker children ) तेलंगाणात मराठी भाषेत शिकणं शक्य नव्हतं. त्यामुळे वीटभट्टीवरील अनेक पिढ्या शिक्षणापासून वंचित राहत होत्या.
पोलीस आयुक्त महेश भागवतांनी सुरू केली वस्तीशाळा -तिमायपल्ली येथील वीटभट्टीवरील मजुराच्या ( brick worker )मुलांना मराठी शाळा नसल्याची बाब रचकोंडाचे पोलीस आयुक्त महेश भागवत ( ips mahesh bhagwat ) यांना समजली. त्यामुळे महेश भागवत यांनी अॅडे अॅक्ट या सामाजिक आणि शिक्षण क्षेत्रात काम करणाऱ्या संघटनेच्या मदतीनं या वीटभट्टीवर वस्तीशाळा ( Worksite School ) सुरू करण्याचा निर्धार केला. अॅडे अॅक्ट या संस्थेचे तेलंगाणा समन्वयक के. सुरेश यांच्या मदतीनं ही वस्तीशाळा ( Worksite School ) सुरू केली. या विटभट्टीच्या शेजारी असलेल्या सभागृहात ही वस्तीशाळा ( Worksite School ) सुरू करण्यात आली. त्याचं उद्घाटन पोलीस आयुक्त महेश भागवत ( ips mahesh bhagwat ) यांच्या हस्ते करुन या मुलांच्या शिक्षणाचा श्रीगणेशा करण्यात आला.