बंगळुरू - कर्नाटकमध्ये येत्या १८ जानेवारीपासून गोवंश हत्या बंदी कायदा अमलात आणला जाणार आहे. मंत्री प्रभू चौहान यांनी याबाबत माहिती दिली. संपूर्ण राज्यात हा कायदा लागू केला जाणार असून कायद्यातील नियमावली पूर्णत्त्वास आली आहे. लवकरच ही नियमावली जाहीर केली जाईल, असेही चौहान यांनी सांगितले.
लवकरच प्राण्यांच्या वाहतुकीबाबतचे नियमही तयारकरून जाहीर केले जातील. एका पत्रकाच्या माध्यमातून मंत्री चौहान यांनी शेतकऱयांना आवाहन केले आहे. शेती व पशुपालनासाठी प्राण्यांची वाहतूक करणे आणि कत्तलीसाठी वाहतूक करणे या नियमांमध्ये शेतकऱ्यांनी गोंधळ करू नये, असे ते म्हणाले.