नाहरगढ - राजस्थानच्या नाहरगड जिल्ह्यात एक अनोखा विवाह पाहायला मिळाला आहे. येथे एका व्यक्तीला मूलबाळ नव्हते. तर त्यांनी आपल्या गायचेच मुलीप्रमाणे संगोपण केले आणि आता त्यांनी गाय आणि नंदीचे लग्न ( Cow marries Rajasthan ) लावून दिले आहे. यावेळी त्यांनी देशाचे कल्याण आणि गोरक्षणाची कामना केली आहे. या आगळ्यावेगळ्या लग्नात गावकऱ्यांसह नातेवाईकही सहभागी झाले होते. हे लग्न सध्या चर्चेचा विषय झाले आहे.
चित्तौडगड जिल्हा मुख्यालयापासून 30 किमी अंतरावर असलेल्या नाहरगडमध्ये हा अनोखा विवाह पाहायला मिळाला आहे. येथे पंडित व आचार्य यांच्या उपस्थितीत हवन करून संपूर्ण विधी व वैदिक विधींनी गाय व नंदी विवाह सोहळा पार पडला आहे. पाच दिवसांचा विवाह कार्यक्रम झाला. सात फेरे घेऊन आणि हार घालून गाय आणि नंदी दोघेही एकमेकांचे जीवनसाथी झाले.