कृष्ण: प्रत्येक आई आपल्या मुलावर तिच्या जीवापेक्षा जास्त प्रेम करते. मग तो माणूस असो वा प्राणी. पण आईच्या मुलाचा डोळ्यासमोर मृत्यू झाला तर तिच्या हृदयावर काय होते हे फक्त तिलाच माहीत. अशीच एक हृदयद्रावक घटना आंध्र प्रदेशातील कृष्णा जिल्ह्यात पाहायला मिळाली, जिथे लॉरीच्या धडकेने एका वासराचा मृत्यू ( Death of the calf ) झाला, त्यानंतर गाय आपल्या वासरासाठी रडताना दिसली.
Mother cow Mourning : लॉरीच्या धडकेत वासराचा मृत्यू झाल्याने गाईने फोडला हंबरडा - लॉरीच्या धडकेने वासराचा मृत्यू
आंध्र प्रदेशातील कृष्णा जिल्ह्यात एक अशी घटना समोर आली आहे, जी ऐकून कोणीही भावनिक होईल. येथे एका लॉरीला धडकल्याने एका वासराचा मृत्यू झाला, त्यानंतर परिसरात गाय रडत ( cow mourns the death of the calf ) राहिली.
जिल्ह्यातील कोदुरू वीज उपकेंद्राजवळ ही घटना घडली. वासराच्या मृत्यूनंतर गाय तासन्तास तिथेच बसून रडत रडत आपल्या वासरासाठी ओरडत होती. यानंतर परिसरातील लोकांनी मृत वासराला तेथून बाहेर काढले. मात्र, त्यानंतरही ती रात्रीपर्यंत परिसरात भटकत डोळ्यात पाणी आणत ( mother cow mourning death of calf ) होती. त्याचवेळी गाईच्या या अवस्थेवर परिसरातील रहिवाशांनाही या घटनेने आपल्या दु:खाचा विचार करायला भाग पाडले.
हेही वाचा -अग्निपथमुळे सैनिकांचे भवितव्य अनिश्चित, ममतांची टीका; 'अंधकार पथ' म्हणून काँग्रेसने केली संभावना