नवी दिल्ली - दक्षिण आफ्रिका आणि अन्य काही देशांमध्ये करोनाचा नवा विषाणू समोर आला आहे. दक्षिण आफ्रिकेच्या नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर कम्युनिकबल डिजीस (एनआयसीडी) आणि क्वाझुलु नेटाल रिसर्च इनोव्हेशन अँड सिक्वेन्सिंग प्लॅटफॉर्मच्या शास्त्रज्ञांनी ही माहिती दिली आहे. दरम्यान, हा विषाणू वेगाने पसरण्याची भीतीही सध्या व्यक्त केली जात आहे. हा विषाणू लसीकरणानंतरही जास्त धोकादायक असल्याचे सांगितले जात आहे.
कोविडचे नवे रूप आले समोर, लसीच्या संरक्षणालाही आव्हान देणार?; तज्ञांनी व्यक्त केला अंदाज - vaccine protection
दक्षिण आफ्रिका आणि अन्य काही देशांमध्ये करोनाचा नवा विषाणू समोर आला आहे. दक्षिण आफ्रिकेच्या नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर कम्युनिकबल डिजीस (एनआयसीडी) आणि क्वाझुलु नेटाल रिसर्च इनोव्हेशन अँड सिक्वेन्सिंग प्लॅटफॉर्मच्या शास्त्रज्ञांनी ही माहिती दिली आहे. दरम्यान, हा विषाणू वेगाने पसरण्याची भीतीही सध्या व्यक्त केली जात आहे.
२४ ऑगस्टला प्रीप्रिंट रिपोजिटरी (MediRxiv)वर एक अहवाल जारी करण्यात आला होता
या विषाणूचे (C.१.२)असे नाव आहे. दक्षिण आफ्रिकेत या नव्या विषाणूची लागण झालेल्या लोकांची संख्या वाढत आहे. मे महिन्यात हे प्रमाण ०.२ टक्के होते. ते प्रमाण जूनमध्ये १.६ टक्के आणि जुलै महिन्यात २ टक्के इतके झाले आहे. करोनाचा हा नवा प्रकार C.१.२ हा चीन, कांगो, मॉरिशस, इंग्लंड, न्यूझीलंड, पोर्तुगाल, स्वित्झर्लंडमध्ये १३ ऑगस्टपर्यंत आढळून आला आहे. २४ ऑगस्टला प्रीप्रिंट रिपोजिटरी (MediRxiv)वर एक अहवाल जारी करण्यात आला होता. त्यामध्ये C.१.२ हा विषाणू (C.२)च्या तुलनेत अधिक घातक असल्याचे सांगण्यात आले आहे. त्यामुळे नव्या विषाणूबाबत सध्या नागरिकांमध्ये चिंता वाढली आहे.