महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

COVID19 India आज 1 लाखाहून कमी सक्रिय कोरोना रुग्ण, 11539 संक्रमित

COVID19 India देशात सातत्याने कमी होत असलेल्या कोरोना रुग्णांमध्ये सक्रिय बाधितांची संख्या एक लाखाच्या खाली पोहोचली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार देशात आता 99879 सक्रिय कोरोना रुग्ण आहेत तर शनिवारपर्यंत सक्रिय रुग्णांची संख्या 101166 होती

COVID19 India
COVID19 India

By

Published : Aug 21, 2022, 10:30 AM IST

मुंबई देशात सातत्याने कमी होत असलेल्या कोरोना रुग्णांमध्ये सक्रिय बाधितांची संख्या एक लाखाच्या खाली पोहोचली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, देशात आता 99879 सक्रिय कोरोना रुग्ण आहेत. तर, शनिवारपर्यंत सक्रिय रुग्णांची संख्या 101166 होती. ताज्या आकडेवारीनुसार, शनिवारच्या तुलनेत आज नवीन कोरोना रुग्णांची संख्याही कमी झाली आहे. आज देशात 11539 नवीन रुग्ण आढळले आहेत. तर, शनिवारी देशात 13272 नवीन कोरोना बाधित आढळले आहेत.

राज्यात बीए व्हेरिएंटचे २८२ नवीन रुग्ण कोरोनाच्या बीए व्हेरिएंटचा राज्यभरात झपाट्याने प्रसार होत आहे. शुक्रवारी राज्यात बीए ४, ५ व बीए २.७५ चे एकूण २८२ नवीन रुग्णांची नोंद झाली असून Maharashtra corona update यापैकी २०३ रुग्ण मुंबईत आढळल्याने मुंबईसह राज्यात बीए व्हेरिएंटचा BA.4 धोका वाढला आहे.

मुंबईत शनिवारी ८४० नवे कोरोना रुग्ण, शून्य मृत्यूमुंबईत १० ऑगस्ट ते १४ ऑगस्टला रोज ८०० हुन अधिक, १७ ऑगस्टला ९७५ रुग्णांची नोंद झाली होती. १८ ऑगस्टला त्यात वाढ होऊन १२०१, १९ ऑगस्टला १०११ रुग्णांची नोंद झाली. आज त्यात किंचित घट होऊन ८४० रुग्णांची new corona cases in on 21 august 2022 नोंद झाली आहे. तसेच आज शून्य मृत्यूची नोंद झाली आहे. मुंबईत सध्या ५३६ बेडवर रुग्ण असल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाकडून देण्यात आली mumbai corona update आहे.

रुग्णसंख्येत वाढमुंबईत गेले दोन वर्षे कोरोनाचा प्रसार आहे. या दरम्यान कोरोनाच्या दोन लाटा आल्या. त्या दोन्ही लाटा थोपवण्यात पालिकेला यश आले आहे. पहिल्या लाटे दरम्यान २ हजार ८०० तर दुसऱ्या लाटेदरम्यान कोरोनाचे ११ हजार ५०० सर्वाधिक रुग्णांची नोंद झाली होती. डिसेंबर महिन्यात कोरोनाची तिसरी लाट आली असून ६ ते ८ जानेवारी दरम्यान सलग तीन दिवस २० हजाराच्यावर रुग्ण आढळून आले. त्यानंतर रुग्णसंख्येत घट झाली. मार्च एप्रिल महिन्यात रुग्णसंख्या ५० च्या खाली आली होती. मे महिन्यात रुग्णसंख्या १०० च्या वर गेली. जून महिन्यात रुग्णसंख्या वाढून २३ जूनला २४७९ रुग्णांची नोंद झाली. त्यानंतर त्यात घट होऊन १८ जुलैला १६७ रुग्णांची नोंद झाली. त्यानंतर रुग्णसंख्येत वाढ होऊ लागली. २ ऑगस्टला ३२९, ३ ऑगस्टला ४३४, ४ ऑगस्टला ४१०, ५ ऑगस्टला ४४६, ६ ऑगस्टला ४८६, ७ ऑगस्टला ४६५, ८ ऑगस्टला ४०७, ९ ऑगस्टला ४७९, १० ऑगस्टला ८५२, ११ ऑगस्टला ६८३, १२ ऑगस्टला ८७१, १३ ऑगस्टला ८६७, १४ ऑगस्टला ८८२, १५ ऑगस्टला ५८४, १६ ऑगस्टला ३३२, १७ ऑगस्टला ९७५, १८ ऑगस्टला १२०१, १९ ऑगस्टला १०११, २० ऑगस्टला ८४० रुग्णांची नोंद झाली आहे.

हेही वाचाEknath khadse नाथाभाऊला आणखी किती बदनाम करणार आहे, शिंदे फडणवीस सरकारला एकनाथ खडसेंचा सवाल

ABOUT THE AUTHOR

...view details