नवी दिल्ली - नागरिकांनी कोरोना नियमांचे पालन न केल्यास कोरोनाची तिसरी लाट (covid third wave) ऑक्टोंबर ते नोव्हेंबर या कालावधीत पुन्हा येऊ शकते, असे कोरोना मॉडेलच्या सरकारी समितीतील संशोधक मनिंद्र अग्रवाल यांनी सांगितले आहे.
संशोधक मनिंद्र अग्रवाल हे सध्या 'सूत्र मॉडल' वर काम करत आहे. ज्यात कोरोनाच्या गणितीय मॉडेल्सचा वापर केला जात आहे. ते म्हणाले की, या कोरोना विषाणूचा नवीन संसर्ग निर्माण झाल्यास तिसरी लाटेचा मोठ्या प्रमाणावर फैलाव हेऊ शकतो.
विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाने गणिताच्या मॉडेल्सचा वापर करून कोरोना विषाणूच्या संसर्गाच्या बाबतीत होणाऱ्या वाढीचा अंदाज वर्तवण्यासाठी मागील वर्षी ही समिती स्थापन केली होती. या समितीत आयआयटी कानपूरचे संशोधक अग्रवाल याचबरोबर आयआयटी हैदराबादचे संशोधक एम. विद्यासागर आणि एकात्मिक संरक्षण कर्मचारी (वैद्यकीय) चीफ लेफ्टनंट जनरल माधुरी कानिटकर यांचाही समावेश आहे. या समितीला दुसऱ्या लाटेबद्दल निरीक्षण न नोंदवल्याबद्दल अनेक आरोपांचा सामना करावा लागला.
ऑगस्टपर्यंत जीवन सुरळीत
तिसऱ्या लाटेचा प्रतिकार, प्रतिकारशक्ती कमी होणे, लसीकरणातील परिणाम आणि अधिक धोकादायक पध्दतीची शक्यता वर्तविली जात होती. जी दुसर्या लाटेच्या दरम्यान झाली नव्हती. याबाबत सविस्तर अहवाल लवकरच प्रसिद्ध केला जाईल, असेही ते म्हणाले.“आम्ही तीन मॉडेल बनवले असून, त्याबाबत खूपच आशावादी आहे. आमचा विश्वास आहे की ऑगस्टपर्यंत जीवन सुरळीत होईल. आणि विषाणूचे पुनरुत्थान होणार नाही. दुसरा इंटरमीजीएट आहे. यामध्ये आमचा असा विश्वास आहे की लसीकरणाची परिस्थिती 20 टक्कयांपेक्षा कमी प्रभावी आहे. त्यांनी तिसऱ्या मॉडेलबद्दल सांगितले की, ऑगस्ट मध्ये एक नवीन संसर्ग येऊ शकतो. तो २५ टक्के जास्त संक्रमक्र रुपात पसरेल. अग्रवाल यांनी शेअर केलेल्या आलेखानुसार, दुसरी लाट ऑगस्टच्या मध्यापर्यंत स्थिर होण्याची शक्यता आहे आणि तिसरी लहर ऑक्टोबर ते नोव्हेंबर दरम्यान शिगेला पोहोचू शकेल. शास्त्रज्ञ म्हणाले की, तिसर्या लाटेत, देशातील प्रकरणांची संख्या दररोज १,५०,००० ते २,००,००० च्या दरम्यान वाढू शकते.